Viral Video: MBA चहावाल्याने खरेदी केली 90 लाखांची मर्सिडीज, व्हिडीओ शेअर करून सांगितला "यशाचा मंत्र"
Trending MBA Chai Wala Video: एमबीए चायवाला (Mba Chai Wala) या नावाने प्रसिद्ध असलेला प्रफुल्ल बिलोरे हा एक प्रसिद्ध व्यक्ती बनला आहे. बिलोरेने नुकतीच 90 लाख रुपयांची मर्सिडीज खरेदी केली आहे.
Trending MBA Chai Wala Video: एमबीए चायवाला (Mba Chai Wala) या नावाने प्रसिद्ध असलेला प्रफुल्ल बिलोरे हा एक प्रसिद्ध व्यक्ती बनला आहे. प्रफुल्लच्या प्रेरणादायी यशस्वी प्रवासामुळे तो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होऊन प्रसिद्ध झाला आहे. साल 2017 मध्ये या एमबीए ड्रॉपआउटने आयआयएम-अहमदाबादसमोर स्वतःचा चहा स्टँड उघडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. जेव्हा त्याचा स्टार्टअप यशस्वी होऊ लागला, तेव्हा त्याने हळूहळू यशाच्या पायऱ्या चढल्या. आता 'एमबीए चा वाला' हे ब्रँड नाव बनले आहे आणि त्याच्या अनेक रेस्टॉरंट चेन देखील चालतात. मात्र आता प्रफुल्ल बिलोरे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बिलोरेने नुकतीच 90 लाख रुपयांची मर्सिडीज खरेदी केली आहे आणि सोशल मीडियावर एक व्हिडीओ (viral video) पोस्ट करून आपला आनंदही शेअर केला आहे.
Trending MBA Chai Wala Video: केक कापून आनंद केला साजरा
बिलोरेने इन्स्टाग्रामवर कार खरेदी केल्याचा व्हिडीओ (viral video) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये (viral video) तो मर्सिडीज शोरूममध्ये आपल्या कुटुंबासह कार खरेदी करताना आणि सेलिब्रेशनसाठी केक कापताना दिसत आहे. व्हिडीओसोबत (viral video) त्याने एक मेसेज देखील लिहिलेला आहे, जो यशाच्या मंत्रासारखा आहे. त्याने लिहिलं आहे की, " बिलेनियर ब्रदर्स..एमबीए चायवाला..व्हिजनला होल्ड करा, प्रोसेसवर विश्वास ठेवा.."
View this post on Instagram
Trending MBA Chai Wala Video: व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
एमबीए चायवाल्याचा (Mba Chai Wala) हा व्हिडीओ (viral video) आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ (viral video) आपल्या स्टोरीवरही ठेवला आहे. तीन दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत तीन लाख युजर्सनी पाहिला आहे. या क्लिपला अनेक लाइक्स आणि कमेंट्सही मिळाल्या आहेत. कमेंटमध्ये एका युजरने लिहिले आहे की, "भाऊ, मस्तच आणि अभिनंदन." आणखी एका यूजरने लिहिले की, "ही अप्रतिम कार खरेदी केल्याबद्दल त्याचे अभिनंदन." याशिवाय अनेक युजर्सनी अशाच प्रकारचे अनेक कमेंट्स त्याच्या पोस्टवर केले आहे.
इतर बातमी: