Trending : 'या' ट्रेनला आहेत 100 डबे , जाणून घ्या जगातील सर्वात लांब ट्रेन कधी आणि कुठे धावते?
Trending World's Longest Train : आल्प्स पर्वतरांगांमध्ये धावणाऱ्या या ट्रेनमध्ये चक्क 100 डबे होते. या ट्रेनची लांबी सुमारे दोन किमी आहे.
Trending World's Longest Train : स्वित्झर्लंडने शनिवारी जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेनचा विक्रम केला. आल्प्स पर्वतरांगांमध्ये धावणाऱ्या या ट्रेनमध्ये चक्क 100 डबे होते. या ट्रेनची लांबी सुमारे दोन किमी आहे. स्वित्झर्लंड येथे रेल्वेच्या 175 व्या वर्धापनदिनानिमित्त रॅटियन रेल्वे (RhB) ने घोषित केले की, त्यांनी जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेनचा जागतिक विक्रम मोडला आहे. ही ट्रेन 1910 मीटर आहे. ट्रेन 25 स्वतंत्र मल्टी-युनिट ट्रेन्स तसेच 100 डब्यांपासून बनलेली आहे. स्वित्झर्लंडची 100 डब्यांची ट्रेन जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन ठरली आहे.
आतापर्यंतची सर्वात लांब प्रवासी ट्रेन स्वित्झर्लंडमध्ये धावली
RhB प्रमुख एका कार्यक्रमात म्हणाले, आतापर्यंतची सर्वात लांब प्रवासी ट्रेन स्वित्झर्लंडमध्ये धावली. आरएचबीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सर्वात लांब ट्रेनचा यापूर्वीचा रेकॉर्ड 1990 च्या दशकात बेल्जियन ट्रेनचा होता, जी शंभर मीटर लांब होती. 175 व्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून हा विशेष विक्रम करण्यात आला आहे.
100 कोच ट्रेनची चाचणी
युरोपच्या Rhaetian रेल्वे कंपनीने 100 कोच असलेली 1.9 किलोमीटर लांब (सुमारे 1.2 मैल लांब) ट्रेन चालवली. ट्रेन अल्बुला/बर्निना मार्गावर प्रीडाहून बर्गेनला येत होती. या मार्गाला 2008 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली होती. हा मार्ग 22 बोगद्यांमधून जातो, त्यापैकी काही पर्वत आणि 48 पुलांवरून जातात, ज्यात वळणदार लँडवॉसर व्हायाडक्टचा समावेश आहे. हा मार्ग जागतिक वारसा श्रेणीत ठेवण्यात आला आहे.
ट्रेन पाहण्यासाठी मोठी गर्दी
हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही ट्रेन पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी झाली होती. हे लोक आल्प्समधून सुमारे 25 किलोमीटर (15.5 मैल) ट्रेनचे 25 विभाग पाहण्यासाठी रांगेत उभे होते. रेनाटो फॅसिआती, रेएटियन रेल्वेचे संचालक, देखील कंपनीच्या यशाने खूप उत्साहित होते. स्वित्झर्लंडच्या अनोख्या कामगिरीद्वारे स्विस रेल्वेची 175 वर्षे साजरी करणे हा या विक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रेनमध्ये 150 प्रवासी
या ट्रेनमध्ये 150 प्रवासी होते. ट्रेनने लांब अल्बुला/बर्निना मार्गावर प्रवास केला, ज्याची युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड केली आहे. ट्रेनने प्रीडा ते अल्वेनु हे 25 किमीचे लांबचे अंतर कापले. सुमारे 3000 लोकांनी ही ट्रेन प्रवास करताना पाहिली.