Mumbai Local Viral video : मुंबई लोकलमधून एक तरुण पडला, अन् समोरच्या तरुणाच्या मोबाईलने दृश्य टिपले, व्हिडिओ व्हायरल
Mumbai Local Viral video : मुंबईतील लोकल ट्रेनमधून 18 वर्षीय मुलाचा पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.

Mumbai Local Viral video : मुंबईतील गर्दीच्या लोकल ट्रेनमधून 18 वर्षीय मुलाचा पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, मुलगा गर्दीने भरलेल्या डब्यात इतर अनेक प्रवाशांसह ट्रेनच्या फूटबोर्डला लटकलेला दिसत आहे. अचानक मुलगा खांब्यावर आदळल्याने हा अपघात झाला. मुलाला फ्रॅक्चर झाले असून त्याला जखमाही झाल्या आहेत. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
दानिश खान कळव्यात त्याची आई, मोठी बहीण आणि लहान भावासह राहतो. हाऊस डेकोरेशन फर्ममध्ये तो मजूर म्हणून काम करतो. गुरुवारी ते कामासाठी दादरला जात असताना हा अपघात झाला. याच ट्रॅकवरून पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या मयूर लिमये याने या अपघाताचा व्हिडिओ टिपला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
The 18-year-old has been admitted with fractures. He was lucky but many others are not.
— megha sood (@memeghasood) June 24, 2022
Railway police appeal to people to not risk their lives like this.@grpmumbai @HTMumbai @RoadsOfMumbai @mumbaimatterz pic.twitter.com/0iBjuTn3g2
फ्रॅक्चरसह अनेक जखमा
दानिशला त्याच्या नातेवाइकांनी कळवा रुग्णालयात नेले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दानिश धोक्याबाहेर आहे पण त्याला फ्रॅक्चरसह अनेक जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती ठाणे पोलिसांनाही देण्यात आली त्यानंतर पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात
मुंबई लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात, बहुतेक मध्यमवर्गीय आणि कामगार वर्ग, ज्यांना दररोज त्यांच्या कामाच्या संदर्भात मुंबईच्या सर्व भागात प्रवास करण्यास दिलासा मिळतो. अशा परिस्थितीत लोकल गाड्यांची संख्या वाढवून त्यातील वाढती गर्दी काही प्रमाणात कमी करता येईल.
संबंधित इतर बातम्या
- Coca Cola Maggie : आता 'कोका कोला मॅगी', मॅगीवरील विचित्र प्रयोगावर नेटकऱ्यांचा संताप
-
Viral Video : गादीवर झोपण्यासाठी हत्तीच्या पिल्लाचे नखरे एकदा पाहाच, तुम्हीही प्रेमात पडाल
-
Viral Video : आजोबांनी कॉपी केली मायकल जॅक्सनची स्टेप, भन्नाट डान्सचा व्हिडीओ एकदा नक्की पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
