(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coca Cola Maggie : आता 'कोका कोला मॅगी', मॅगीवरील विचित्र प्रयोगावर नेटकऱ्यांचा संताप
Coca Cola Maggie Viral Video : आजकाल लोक अन्नपदार्थांसोबत विचित्र प्रयोग करताना पाहायला मिळतात. आता कोको कोला मॅगी बनवण्यात आली आहे.
Coke Maggie Viral Video : सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ कधीही व्हायरल होऊ शकतो. सध्या अनेक जण अन्नपदार्थांवर वेगवेगळे प्रयोग करताना पाहायला मिळतात. अशा पदार्थांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. कधी हे अन्नपदार्थ नेटकऱ्यांचं मन जिंकतात, तर कधी नेटकरी अशा विचित्र प्रयोगांवर चांगलेच संतापतात.
सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. फक्त दोन मिनिटांमध्ये बनणारी मॅगी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सोशल मीडियावर मॅगीवरील वेगवेगळ्या प्रयोगाचे व्हिडीओ समोर येतात. सध्या कोका कोला मॅगी चर्चेचा विषय बनली आहे. हो तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे थंड पेय कोका कोला आणि गरमा गरम मॅगीची रेसिपी तुम्ही कधी पाहिला काय ऐकली ही नसेल.
आम्ही तुम्हांला या कोका कोला मॅगीबद्दल सांगणार आहोत. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता मॅगी बनवताना दिसेल. ही रेसिपी बनवताना तो आधी एका पॅनमध्ये तेलात कांदा, मिरची आणि टोमॅटो परतवून घतो. नंतर यामध्ये मसाला टाकतो. यानंतर मात्र तो पॅनमध्ये चक्क कोका कोला टाकतो. यानंतर या मिश्रणाला उकळी आल्यावर त्यामध्ये मॅगीचे नूडल्स टाकतो. अशा प्रकारे ही कोका कोला मॅगी तयार होते.
'देसी फुड क्राफ्टस' नावाच्या एका युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मॅगीवरील हा विचित्र प्रयोग पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी कमेंट करत ही मॅगी खाण्यायोग्य आहे का, असा सवालही उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
याआधीही मॅगीसह आईस्क्रीम आणि चहावरही असे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. कोका कोला मॅगी आधी मँगो मॅगी चर्चेत आली होती. याशिवाय मिरची आईस्क्रीम, गाजर हलवा आईस्क्रीम आणि फ्रूट टी सुद्धा व्हायरल झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या