एक्स्प्लोर
Raigad : मुरुडच्या काशीद किनारी पर्यटकांच्या गाड्या जळून खाक
Raigad : मुरुड (Murud) तालुक्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. काही पर्यटक शनिवारी (दि.25) समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.

Photo Credit - abp majha reporter
Raigad : मुरुड (Murud) तालुक्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. काही पर्यटक शनिवारी (दि.25) समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी त्यांची कार किनाऱ्यावर असलेल्या रस्त्यावर पार्क केल्या होत्या. दरम्यान, पर्यटकांच्या या गाड्या जळून खाक झाल्या आहे. ठाण्यातून हे पर्यटक मुरुड येथे आले होते. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रस्त्यालगत पार्क केल्या होत्या कार
ठाणे येथून पर्यटनासाठी काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी बाजूलाच असलेल्या रस्त्यालगत कार पार्क केल्या होत्या. दरम्यान, पार्क करुन ठेवण्यात आलेल्या दोन्ही कार अचानक पेट घेऊन खाक झाल्यात यासंबंधी , पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एल.डी.गोंधळी हे अधिक तपास करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
