एक्स्प्लोर
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
Ganeshotsav: गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर कोकणात साखर चौथ गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. यावेळी, गणपती बाप्पांचे वाजत गाजत घरी स्वागत केले जाते.

ganesh festival of sakhar chauth in kokan
1/7

गणपती बाप्पांचे मोठ्या थाटामाटात घरोघरी स्वागत झाले, तसेच सार्वजनिक गणेश मंडळाताही धुमधडाक्यात बाप्पा विराजमान झाले होते.
2/7

गेल्या 10 दिवस सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. घरोघरी आणि मोठ्या शहरातही गणेशोत्सावाचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, भावूक वातावरणात बाप्पांना निरोपही देण्यात आला.
3/7

दीड दिवस, 5 दिवस, 7 दिवस बाप्पांची पूजा करुन अनंत चतुदर्शी दिवशी देशभरातील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. प्रशासनाने बांधलेल्या कृत्रिम ठिकाणी, तसेच समुद्र, तलाव आणि विविध जलाशयांत बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
4/7

गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर कोकणात साखर चौथ गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. यावेळी, गणपती बाप्पांचे वाजत गाजत घरी स्वागत केले जाते.
5/7

अनंत चतुर्थीचे गणपती विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीला साखर चौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. हा गणेशोत्सव दीड दिवसांचा असतो.
6/7

कोकणात देखील साखर चौथचे गणपती बाप्पा रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड,पेण, पनवेल, उरण, अलिबाग, रोहा, माणगाव, महाड आदी सर्वच तालुक्यात हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
7/7

गावो गावी सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने साखर चौथ गणपती बाप्पांचे आगमन होते. या दिड दिवसांच्या बाप्पाला आज रायगड जिल्ह्यांत ठिकठिकाणी निरोप देऊन विसर्जन केलं जातंय.
Published at : 22 Sep 2024 07:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
