एक्स्प्लोर

Tanaji Sawant In Pune: घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर; तानाजी सावंतांचा अजब पुणे दौरा व्हायरल

घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर, असा हा दौरा आखण्यात आल्यामुळे त्याचा पुणे दौरा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Tanaji Sawant In Pune : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत  (Tanaji Sawant)  तीन दिवस पुण्यात (Pune) असणार आहेत.  जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांचा या तीन दिवसांचा दौरा जाहीर करण्यात आला.  या दौर्‍यात मंत्री तानाजी सावंत हे पुण्यातील कात्रज भागातील त्यांच्या घरून निघून कात्रजमधील बालाजी नगर भागातील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात जाणार आणि  तिथून पुन्हा त्यांच्या घरी परतणार एवढा प्रवास करणार आहेत. मंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज मधील घरापासून त्यांच्या उद्योग समूहाचे कार्यालय अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र तीन दिवसांत मंत्री घर ते  उद्योग समूहाचे कार्यालय आणि पुन्हा घर या दरम्यानच प्रवास करणार आहेत. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर, असा हा दौरा आखण्यात आल्यामुळे त्याचा पुणे दौरा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दरवेळी कोणत्याही नेते किंवा मंत्र्यांचा दौरा जाहीर झाला की त्यांचा विविध ठिकाणचा आढावा असतो. काही बैठका असतात महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी असतात, पत्रकार परिषद किंवा सभा असतात मात्र नवनिर्वाचीत आरोग्य मंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या दौऱ्यात कोणत्याही बैठका, सभा किंवा पत्रकार परिषद नसल्याने आणि या प्रवासादरम्यान पोलीसांचा कॉनव्हॉय तैनात असल्याने सगळीकडे या दौऱ्याची चर्चा होत आहे.

त्यांच्या या दौऱ्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावर विरोधकांनी टीकासुद्धा केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबुकवर त्यांच्या दौऱ्याचा फोटो शेअर करत या अजब दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. 'हा किती कामाचा दौरा आहे पहा, महाराष्ट्राची वाटोळे करणारे हेच अडाणी लोक घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर', अशी टीका त्यांनी फेसबुकवरुन केली आहे. 

सोशल मीडियावर कायम चर्चेत

शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यापासून तानाजी सावंत हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहेत.  कोण ते आदित्य ठाकरे? असं त्यांनी विधान केलं होतं. यावरुन चर्चेत राहिले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पालघरच्या आरोग्य यंत्रणेबद्दल विरोधकांकडून त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावरुन देखील ते सोशल मीडियावर चर्चेत होते. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्याने पहिल्याच दिवशी त्यांची दमछाक झाली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha Top Headlines 07 March 2025Special Report | Mohammed Shami Roza | देशासाठी खेळणाऱ्या शमीवर आगपाखड कशाला? 'रोजा'वरुन मौलानांची मुक्ताफळंSpecial Report Satish Bhosale Profile : नोटांचे बंडल, दहशत पसरवणारा सतिश भोसले आहे तरी कोण?Vaibhavi Deshmukh : Santosh Deshmukh यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोंवर लेकीची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma : 4 वर्षात 4 आयसीसी फायनल, सूर्यकुमार यादवकडून रोहित शर्माला जाडा म्हणणाऱ्यांची बोलती बंद, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर म्हणाला...
रोहित शर्माच्या फिटनेस विषयी बोलणाऱ्यांची बोलती बंद, सूर्यादादानं ICC स्पर्धांचा इतिहास काढला
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Embed widget