महिलांसाठी सर्वोत्तम 5 सरकारी योजना कोणत्या? नेमका किती मिळतो फायदा? जाणून घ्या सविस्तर माहिती
Government Schemes for Women : महिलांसाठी सर्वोत्तम असणाऱ्या सरकारी योजना कोणत्या आहेत? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

Government Schemes for Women : आज प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. मग ते लष्करात असो डॉक्टर वकील, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात महिला काम करताना आघाडीवर दिसत आहेत. पण महिलांसाठी सर्वोत्तम असणाऱ्या सरकारी योजना कोणत्या आहेत? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
सरकार महिलांसाठी दररोज वेगवेगळ्या योजना सुरू करत असते. आम्ही यापैकी 5 सर्वोत्तम योजनांबद्दल बोलणार आहोत. या योजनेत तुम्हाला पैसे गमावण्याची भीती नाही. कारण या सर्व योजना सरकारने जाहीर केल्या आहेत.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही योजना गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ते सुरू करण्यात आली आहे. ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा एक भाग आहे. या योजनेंतर्गत वार्षिक 8.2 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. यासोबतच तुम्हाला इन्कम टॅक्स सेक्शन 80C अंतर्गत कर सूटही मिळते. तुम्ही फक्त 250 रुपये गुंतवून ही योजना सुरु करू शकता. या योजनेत तुमचे पैसे 14 वर्षांसाठी जमा राहतात.
सुभद्रा योजना
ही योजना विशेषतः ओडिशात राहणाऱ्या महिलांसाठी जारी करण्यात आली आहे. 21 ते 60 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ओडिशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत पाच वर्षांत 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
लाडकी बहिण योजना
लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू केली होती. 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेत अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपये दिले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनवण्याचाही या योजनेचा उद्देश आहे.
मात्र, ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नाही अशा महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांतर्गत महिलांना 7.5 टक्के परतावा मिळतो. ही योजना 2023 मध्ये सुरू झाली. याशिवाय NCIGSE हा शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या योजनेंतर्गत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत दिली जाते.
महत्वाच्या बातम्या:























