Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Goregaon Housing Project : म्हाडातर्फे आम्हाला पुनर्विकास नको अशी मागणी करत येथील काही रहिवाशांनी हायकोर्टाकडे मागणी करत हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती.

मुंबई : गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा बहुचर्चित पुनर्विकास खासगी बिल्डरकडून करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं म्हाडाला परवानगी दिली आहे. 142 एकर वरील हा पुनर्विकास म्हाडा मार्फत न करता खासगी विकासकाकडून करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा म्हाडानं हायकोर्टाकडे केला होता. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरात सर्वसामान्यांसाठी सुमारे 33 हजार घर म्हालाडा उपलब्ध होणार आहेत.
हा पुनर्विकास करण्याची परवानगी आम्हालाच द्यावी, म्हाडातर्फे आम्हाला पुनर्विकास नको अशी मागणी करत येथील काही रहिवाशांनी हायकोर्टाकडे मागणी करत हस्तक्षेप याचिका करत म्हाडाच्या अर्जाला विरोध केला होता जो हायकोर्टानं अमान्य केला. मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. गुरूवारी हायकोर्टानं याबाबत राखून ठेवलेला आपला निकाल जाहीर केला.
सुरूवातीला हा पुनर्विकास म्हाडाच करणार होती. साल 2013 मध्ये तशी हमी म्हाडानं हायकोर्टात दिली होती. मात्र साल 2018 मध्ये याचा खर्च 21 हजार कोटींपर्यंत पोहचला होता. त्यामुळे खासगी विकासकाकडून याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडानं घेतला. या पुनर्विकासात म्हाडाला 33 हजार घरे मिळणार आहेत.
गेली दही वर्षे रखडलेला हा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण करण्याचा म्हाडाचा मानस आहे. यासाठी तांत्रिक निविदा मागवण्यात आल्या असून लवकरच आर्थिक निविदाही मागवल्या जाणार आहेत.
पत्राचाळीतील 672 रहिवाशांना हक्काची घरं मिळणार
गोरेगावमधील पत्राचाळीतील रहिवाशांचा मागील 15-16 वर्षांपासून घरांसाठी संघर्ष सुरु होता. म्हाडाकडून पत्राचाळ पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. 2022 पासून म्हाडाकडून याचे बांधकाम सुरु होते. आता ते पूर्ण झाले असून लवकरच पत्राचाळीतील 672 रहिवाशांच्या घरांची प्रतिक्षा संपणार आहे.
पत्राचाळीच्या रहिवाशांना घरांसाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. सोबतच विकासकांनी केलेल्या परवडीनं त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. आता त्यांचा संघर्ष संपला असून त्यांना हक्काची घरं देण्यात येणार आहेत. पत्राचाळीतील रहिवाशांसाठी 16 इमारतीत 2.5 बीएचकेचे 650 चौ.फुटाचे घर आणि त्याला 117चौ.फुटाची बाल्कनी देण्यात आली आहे. सोबतच, सुसज्ज असे दोन मजली पार्किंग, दोन गार्डन परिसर, फिटनेस सेंटर आणि मेडिटेशन सेंटर देखील देण्यात आले आहेत. प्रत्येक विंगला दोन लिफ्ट आणि एक स्टेअरकेसची उभारणी आहे. प्रत्येक फ्लॅटधारकाला एका पार्किंगची व्यवस्था देखील केली गेली आहे.
ही बातमी वाचा:























