Special Report Satish Bhosale Profile : नोटांचे बंडल, दहशत पसरवणारा सतिश भोसले आहे तरी कोण?
Special Report Satish Bhosale Profile : नोटांचे बंडल, दहशत पसरवणारा सतिश भोसले आहे तरी कोण?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर अमानुषतेचा कळस गाठणारी बीडमधलीच आणखी एक घटना समोर आली...भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेनं दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या दोघांना काही दिवसांपूर्वी जबर मारहाण केली. त्यात दिलीप ढाकणे यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली, त्यांचे आठ ते दहा दात पाडले...तर महेश ढाकणे यांचा पाय फ्रॅक्चर झाला. दोन वर्षांपूर्वीही सतीश भोसलेनं अशीच अमानुष मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओसुद्धा सध्या व्हायरल होतोय... सतीश भोसलेविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचाच सतीश भोसले हा कार्यकर्ता आहे. गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेला सतीश भोसले अय्याशीचं जीवन जगतो.
All Shows

































