अवैधरीत्या दारु विक्री, कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला, 1 अधिकारी आणि 4 कर्मचारी जखमी
Jalna Crime News : होळी (Holi) निमित्ताने अवैधरीत्या दारुसाठा करुन विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या दारुबंदी पथकावर हल्ला (Attack on liquor ban squad) झाल्याची घटना घडली आहे.
Jalna Crime News : होळी (Holi) निमित्ताने अवैधरीत्या दारुसाठा करुन विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या दारुबंदी पथकावर हल्ला (Attack on liquor ban squad) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील गुळखंड तांडा इथं घडली आहे. दारु साठ्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण आणि दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एक अधिकारी आणि चार कर्मचारी जखमी झाले आहेत.
छाप्यादरम्यान अचानक जमाव झाला आक्रमक
कारवाई करण्यासाठी दारुबंदी पथकात 2 अधिकारी, 4 कर्मचारी आणि 1 महिला कर्मचारी होते. दुपारी खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने या गावात छापा टाकला आहे. मात्र, छाप्यादरम्यान अचानक जमाव आक्रमक झाला आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
मद्यातून महसुलात वाढ करण्यासाठी सरकारनी स्थापन केली समिती, 2 महिन्यात अहवाल सादर करणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
