Vaibhavi Deshmukh : Santosh Deshmukh यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोंवर लेकीची पहिली प्रतिक्रिया
Vaibhavi Deshmukh : Santosh Deshmukh यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोंवर लेकीची पहिली प्रतिक्रिया
मारहाणी च्या फोटो नंतर वैभवी देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे फोटो वायरल झाल्यानंतर वैभवी देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया.. वैभवीला अश्रू अनावर. आरोपी मारहाण करताना हासत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. कुठल्यातरी वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणं अशक्य नाही.. अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने दिली आहे.
हे ही वाचा...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात संतोष देशमुख हत्याकांड, लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana), छावा सिनेमा आणि संभाजी महाराजांबद्दल आमदार अबू आझमी यांनी केलेलं वक्तव्य सध्या गाजत आहे. त्यातच, विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येत असल्यावरुन सरकारवर टीका केली आहे. तसेच, निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याची देखील विचारणा होत आहे. मात्र, महायुतीने पहिल्याच अर्थसंकल्पा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे म्हटले नसल्याचे सांगत 5 वर्षातील कार्यकाळात याचा निर्णय होईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या अपात्रतेचा मुद्दा गाजत आहे. त्यातच, आमदार अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेंसदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठीच ही योजना होती, पण त्याचा फायदा वेगळ्याच महिला घेत आहेत, असे आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे.






















