Maharashtra Breaking News LIVE Updates: Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: सतीश भोसले उर्फ खोक्याला आज प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर करणार आहेत. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates: कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आज होलिका दहन असून देवाच्या पालख्यांची मिरवणूक, तर रस्त्यावर सोंगांची धमाल, महिषासुर आणि संकासुराच्या खेळानं रंगत वाढली आहे. तर सतीश भोसले उर्फ खोक्याला आज प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर करणार आहेत. बीडमधील अमानुष मारहाणप्रकरणी खोक्याला अटक करण्यात आली. तर पुण्यातील स्वारगेट बलात्कारप्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दत्ता गाडेवर आणखी तीन कलमांची वाढ देखील करण्यात आली आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी
ब्रेकिंग
आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी
(आयआयसीटी म्हणजे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी)
फिल्मसिटीत जागा देणार, केंद्र सरकार यासाठी ४०० कोटी देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत घोषणा
अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या... आधी दारू पाजली अन् कोयत्याने गळा चिरून केली हत्या
अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या... आधी दारू पाजली अन् कोयत्याने गळा चिरून केली हत्या... गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील सावंगी पदमपुर शेतशिवारातील घटना...
Anchor : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी-पदमपुर शेतशिवरात आज सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला होता. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे... श्रवण सोनवणे (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे...
मृतक नरेश चौधरी व आरोपी श्रवण सोनवणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून काल रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले.. तिथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेतशिवारामध्ये जेवण करण्याचा बेत आखला... दोघांनी मद्यप्राशन केले त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश याच्यावर धारधार कोयत्याने वार केले.. यातच नरेश याचा मृत्यू झाला... आज सकाळी नरेशचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी श्रवण सोनवणे याला अटक केली आहे.. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे... घटनेचा पुढील तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे...























