Chandra Grahan 2025 : धूलिवंदनाच्या दिवशी 'या' 3 राशींवर असणार चंद्रग्रहणाचं सावट; 24 तास राहावं लागेल अलर्ट
Chandra Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, धूलिवंदनाच्या दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. या चंद्रग्रहणाची वेळ सकाळी 9.29 ते 3.29 पर्यंत असणार आहे.

Chandra Grahan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची एका ठराविक अंतराने आपली स्थिती बदलते. याचा सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो. त्याचप्रमाणे 2025 या नव्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) उद्या म्हणजेच 14 मार्च रोजी आहे. या दिवशी धूलिवंदन देखील असणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, धूलिवंदनाच्या दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. या चंद्रग्रहणाची वेळ सकाळी 9.29 ते 3.29 पर्यंत असणार आहे. चंद्रग्रहण जरी भारतात लागणार नसलं तरी ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक राशींन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी सावध राहण्याची गरज आहे. या राशीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, उद्याच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु नका. अन्यथा तुमचं नुकसान होईल. तसेच, उद्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचा दिवस फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये अनेक अडथळे येऊ शकतात.याचा तुम्ही धिटाईने सामना करावा. तसेच, तुमच्या आजूबाजूला जी नकारात्मक लोक असतील त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या वागण्यात देखील तो सूर दिसून येईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतली. या सगळ्याचा तुम्ही शांत डोक्याने सामना करावा. तसेच, अनेकदा तुमच्या अपेक्षाभंग देखील होतील. यासाठीच कोणावर विश्वास ठेवू नका. तसेच, भावनिक राहू नका. जो काही निर्णय घ्याल तो प्रॅक्टिकलपणे घेणं गरजेचं आहे. तसेच, विनाकारण कोणाच्या जीवनात लुडबूड करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















