एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Holi 2025 : होळीला चंद्रग्रहण आणि 4 राजयोगाचा शुभ संयोग; 15 मार्चपासून 'या' 5 राशी होतील धनवान, आरोग्यही राहील ठणठणीत
Holi 2025 : होळी आणि चंद्रग्रहणाच्या वेळी 4 शुभ योगाचा संयोग जुळून येणार आहे. हा काळ 5 राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे.
Holi 2025
1/8

ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. पण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात नसणार.
2/8

मात्र, चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणा बरोबरच 4 राजयोगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. यामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
3/8

वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात नवीन नोकरीची संधी मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे.
4/8

मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात चंद्र ग्रहणामुळे चांगलं यश मिळणार आहे. या काळात अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. तसेच, मंगळ ग्रहामुळे तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो. मात्र, दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील.
5/8

तूळ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचा काळ फार शुभ असणार आहे. या राशीच्या सहाव्या चरणात शुभ योग जुळून येणार आहे. या काळात तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तसेच, या दिवसाच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
6/8

चंद्रग्रहणाचा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, तुमचं करिअर यशाच्या टोकावर असेल.
7/8

धनु राशीच्या लोकांसाठी चंद्र ग्रहणाचा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Mar 2025 02:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























