Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha Top Headlines 07 March 2025
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha Top Headlines 07 March 2025
विधानामुळे गैरसमज झाला आहे असं वाटतं, महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा मराठी आहे याबद्दल दुमत नाहीच. वादानंतर भय्याजी जोशींकडून सारवासारव.
इतर राज्यात अशी विधान करुन भैय्याजी जोशींनी सुखरूप परत येऊन दाखवावं , उद्धव ठाकरेंचं आव्हान. यामागे संघाचा छुपा अजेंडा असल्याचाही ठाकरेंचा आरोप
भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं, राज ठाकरेंचं थेट आव्हान. भाजप महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन जोशींचा निषेध नोंदवणार का?, राज ठाकरेंचा संतप्त सवाल.
राज ठाकरे तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?. भय्याजी जोशींच्या विधानावरील वादावर गुणरत्न सदावर्तेंचा सवाल. भाषेची सक्ती करणं मुघली विचारांचं प्रतिक, सदावर्तेंची राज ठाकरेंच्या पोस्टवर टीका.
भाजप आमदार राम कदम यांच्याकडून भय्याजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न. भैय्याजी जोशी जे बोलले त्यामागचा भाव समजून घेतला पाहिजे, राम कदम यांची प्रतिक्रिया.






















