एक्स्प्लोर

Rohit Sharma : 4 वर्षात 4 आयसीसी फायनल, सूर्यकुमार यादवकडून रोहित शर्माला जाडा म्हणणाऱ्यांची बोलती बंद, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर म्हणाला...

Rohit Sharma Fitness: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला फिटनेस वरुन ट्रोल करणाऱ्यांना सूर्यकुमार यादवनं उत्तर दिलं आहे. रोहित शर्माच्या कामगिरीचा लेखा जोखा त्यानं मांडला.  

Suryakumar Yadav Reaction on Rohit Sharma Fitness मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंड विरुद्ध अंतिम फेरीत विजय मिळवण्याच्या इराद्यानं भारत मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारत अंतिम फेरीत पोहोचला असतानाच एका नव्या वादाला सुरुवात झाली होती. ती म्हणजे रोहित शर्माचा फिटनेस होय. टीम इंडियाच्या टी 20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव रोहित शर्माच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी एका सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले होते. रोहित शर्माचा फिटनेस चांगला नसून तो छाप न पाडणारा कर्णधार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर शमा मोहम्मद यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.      

रोहित शर्माच्या फिटनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सूर्यकुमार यादवनं उत्तर दिलं आहे. सूर्यकुमार यादव एएनआय या वृत्तसंस्थेंशी संवाद साधत होता. त्यावेळी सूर्यकुमार यादवनं रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं गेल्या चार वर्षात चार आयसीसी फायनल  खेळल्याचं म्हटलं. रोहित शर्माला आपण कर्णधार म्हणून पाहिलं तर, गेल्या चार वर्षात टीमला आयसीसी फायनलमध्ये घेऊन गेला आहे. ही देशासाठी मोठी गोष्ट आहे. एक व्यक्ती जर  15 ते 20 वर्षांपासून क्रिकेट खेळत असेल तर मोठी गोष्ट आहे. त्यासाठी फिटनेस किती महत्त्वाचा हे मी पाहिलं आहे. फ्रँचायजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो खूप मेहनत करतो.  तो सध्या त्याच्या करिअरमध्ये टॉपवर आहे, फायनल मॅच जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.   

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मी भारताच्या नजरेतून पाहतो. मी पहिल्यांदा सांगितलं आहे की भारतीय क्रिकेट टीम चांगलं क्रिकेट खेळत आहे, असंच क्रिकेट खेळत राहिले तर फायनल ही फक्त आणखी एक मॅच असेल. आम्ही अशीच कामगिरी केली तर विजय मिळवणं अधिक कठीण होणार नाही.  

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं गेल्यावर्षी जून महिन्यात आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. त्यापूर्वी भारतानं आयसीसी वनडे वर्ल्ड कपच्या फायनल आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

इतर बातम्या : 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Commonwealth Games 2026 : भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
Team India : भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget