(Source: Poll of Polls)
Omkareshwar Temple In Pune: श्रावण सोमवार विशेष! 285 वर्ष प्राचीन असलेल्या ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास
हे प्राचीन मंदिर 1740 ते 1760 च्या दरम्यान मराठा साम्राज्यातील शासक कृष्णाजी पंत चित्रव यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू शिवराम भट यांच्या आदेशानुसार बांधले होते असे मानले जाते.
Omkareshwar Temple In Pune: पुण्यातील शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिर आहे. मंदिराचा परिसर मुठा नदीत घाटापर्यंत पसरतो. हे प्राचीन मंदिर 1740 ते 1760 च्या दरम्यान मराठा साम्राज्यातील शासक कृष्णाजी पंत चित्रव यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू शिवराम भट यांच्या आदेशानुसार बांधले होते असे मानले जाते. श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते
मंदिराचा इतिहास
मंदिराच्या बांधकामाला सदाशिवराव चिमणाजी, ज्यांना चिमणाजी अप्पा किंवा भाऊसाहेब म्हणतात, जे मराठा सैन्यात सेनापती होते, यांच्या देणग्यांचा आधार होता. चिमणाजींनी बांधकाम पूर्ण होईपर्यंत सहा वर्षांपर्यंत दर महिन्याला 1,000 रुपये दिले आणि त्यांच्या निधनापर्यंत मंदिराला नियमित भेट दिली असे मानले जाते. त्यांची समाधी त्यांच्या सन्मानार्थ मंदिर परिसरात आहे. त्याचप्रमाणे काळूबुवा महाराज, केशवराव महाराज देशमुख, नाना महाराज साखरे या प्रमुख धार्मिक व्यक्तींच्या समाधीही मंदिर परिसरात आहेत. विठ्ठल रामजी शिंदे पुलाच्या बांधकामामुळे मंदिराचा परिसरच बदलून गेला आहे.
राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान लोकमान्य टिळक आणि वीर सावरकरांसारखे प्रख्यात क्रांतिकारक आणि राजकीय नेते, ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात, विशेषत: तालीम नावाच्या ठिकाणी जमायचे जिथे स्वातंत्र्य मिळवण्याच्या विविध योजना आणि रणनीतींवर चर्चा केली जात असत. 1906 मध्ये जेव्हा वीर सावरकरांनी ब्रिटीशांच्या मालावर बहिष्कार टाकण्यासाठी आग लावण्याचे ठरवले तेव्हा ते आणि त्यांचे अनुयायी तालीम येथे एकत्र जमले होते.
हिंदू पौराणिक कथांमध्ये ओंकारेश्वर हे नृत्य, कला, ध्यान आणि योगाचे देवता भगवान शिव यांच्या नावांपैकी एक आहे आणि मंदिर त्यांना आणि त्यांची पत्नी, देवी पार्वती यांना समर्पित आहे. मंदिराच्या शिवलिंगाला शालुंका म्हणजेच आहे आणि त्या शिवलिंगाला बाण म्हणतात. पेशवे दफ्तर मधील नोंदी सांगतात की हा बाणा सुमारे 1738 मध्ये नर्मदा नदीतून 700 रुपयांना आणला गेला होता, असं इतिहासक सांगतात. मंदिराच्या बाहेरील भिंती काळ्या दगडापासून बनवलेल्या आहेत, ज्यामुळे मंदिराच्या आतील भाग उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहतो. मंदिराच्या प्रांगणाला लागून नगारखाना म्हणजचे लहान हॉल आहे.
हे सगळे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
1. महाशिवरात्री
2. श्रावण सोमवार, श्रावणाचा पहिला सोमवार, हिंदू कॅलेंडरचा सर्वात शुभ महिना मानला जातो.
3. त्रिपुरारी पौर्णिमा, ज्याला कार्तिक पौर्णिमा असेही म्हटलं जातं, हा प्रकाशाचा सण, कार्तिक महिन्यातील पौर्णिमेदरम्यान साजरा केला जातो. सगळ्या मंदिरात दिवे लावून हा सण साजरा केला जातो.
4. मंदिर वर्धपन दिन किंवा मंदिराचा स्थापना दिवस