एक्स्प्लोर

महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार

याबाबत बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत.

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्या 8 मार्च रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये (Gramsabha) विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाच्या संपल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (Women) केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश 6 मार्च 2025 रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचार आणि महिला सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला असता या निर्णयाचे स्वागत होत आहे. 

याबाबत बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतानाही, विधवा महिलांना रुढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागते आहे. या सोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून गावात बालविवाह होउ न देणे, पतीच्या निधनानंतर महिलांना जाचक असणार्या प्रथा बंद करणे, गावात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे असे ठराव करण्यात यावे अशी आयोगाची संकल्पना आहे. संपुर्ण गावात असे ठराव शासकीय पातळीवर झाल्यास जनसामान्यांच्या मनात महिलांना सन्मानाने वागवणे ही कर्तव्य भावना रुजवता येईल. महिलांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही अशा प्रयत्नांतून बदलेल म्हणून आय़ोगाने ही संकल्पना मांडल्याचे त्यांनी सांगितले. विशेष ग्रामसभा आय़ोजित करण्यास निर्देश दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांचे आभार मानले आहेत. राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या विषयांकरिता विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मैलाचा दगड असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्य महिला आयोगाने 28 फेब्रुवारी 2025 रोजी याबाबत कार्यवाही करण्याकरिता ग्रामविकास विभागाला पत्राद्वारे कळविले होते. तसेच केंद्र शासनाच्या पंचायती राज विभागाच्या अपर सचिवांनी देशातील सर्व राज्यातील ग्रामविकास सचिवांना 21 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रान्वये जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभा आयोजित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.

हेही वाचा

मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोठी बातमी : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोठी बातमी : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Embed widget