एक्स्प्लोर
Dattatray Gade: दत्ता गाडेच्या फोनमध्ये नेमकं काय? लपवलेल्या फोनच्या तपासासाठी पोलिस उसाच्या फडात
Dattatray Gade: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला घेऊन पुणे पोलीसांचे पथक गुनाट या त्याच्या गावी पोहचले आहेत.
Dattatray Gade
1/9

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला घेऊन पुणे पोलीसांचे पथक गुनाट या त्याच्या गावी पोहचले आहेत.
2/9

दत्ता गाडे जेव्हा गावच्या शिवारात लपुन बसला होता तेव्हा त्याने त्याच्याकडील मोबाईल शेतात फेकुन दिला होता.
3/9

तो मोबाईल शोधण्यासाठी पोलीसांनी दत्ता गाडेसह गाठलं गुनाट गाव. तपासासाठी गाडेकडील मोबाईल ताब्यात येणं पोलीसांसाठी महत्वाचं आहे.
4/9

त्याच्या मोबाईलमध्ये अन्य काही गुन्ह्यांबदल माहिती सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे त्याचा फोन पोलिसांसाठी महत्त्वाचा आहे.
5/9

दत्ता गाडेची चौकशी करत असताना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
6/9

आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेच्या मोबाईलचा तपास सुरू आहे. नराधम गाडे हा एका शेतात जाऊन लपला होता. त्यावेळेस त्याने घटना घडल्यानंतर आपला मोबाईल हा शिरूरच्या एका शेतात फेकल्याची कबुली दिली आहे.
7/9

ही घटना घडल्यानंतर दत्ता गाडेनी आपला मोबाईल हा शेतात लपवला आहे असे पोलीस तपासातून समोर आलं आहे.आता या मोबाईलचा शोध पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.
8/9

घटना घडल्यानंतर दत्ता गाडेनी घटना घडल्यावर मोबाईलवरून कोणा कोणाला फोन केले? याचा तपास केला जाणार आहे
9/9

तसेच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाइन ऍप्लिकेशनवरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का? याचा सुद्धा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. मोबाईल सापडल्यावर त्याच्यातून कोण कोणत्या गोष्टी समोर येतात? हे बघणं तितकच महत्वाचं ठरणार आहे.
Published at : 07 Mar 2025 04:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















