एक्स्प्लोर
Leopard: मावळात झाडावर चढून बसला बिबट्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, रेस्क्यू ऑपरेशन अन्...
Leopard in Maval: हा बिबट्या एका झाडावर निवांत बसला होता, मावळ वनविभागाचे पथक आंबेगाव येथे दाखल झाले.
Leopard in Maval
1/5

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात आंबेगाव येथे दिवसा बिबट्या आल्याने, स्थानिक ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2/5

हा बिबट्या एका झाडावर निवांत बसला असून, मावळ वनविभागाचे पथक आंबेगाव येथे दाखल झाले.
3/5

या गावातील एक शेतकरी शेतात जात असताना हा बिबट्या त्याच्या अंगावर धावून आला यात शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे. ज्या ठिकाणी हा बिबट्या आला आहे, त्याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
4/5

इथे पवना धरणाची बँक वॉटर असल्याने येथे कॅम्पिंग मोठ्या प्रमाणावर असल्याने वनविभाग आणि लोणावळा ग्रामीण पोलीसांनी पर्यटकांना कॅम्पसच्या बाहेर न येण्याच्या सूचना केल्या आहेत.
5/5

या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे.
Published at : 07 Mar 2025 10:31 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























