Pune News: 'पोरं आणून तुला ठोकतेच'...आंदेकरच्या मारक्या बहिणींनी अखेर शब्द खरा केला
Vanraj Andekar: बहिणीने वाद झाला त्यावेळी रागात 'तुला पोरं बोलवून ठोकतेच', अशी धमकी दिली होती. अखेर बहिणीने ते शब्द खरे केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे : वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder) रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रॉपर्टीच्या वादावरून सख्ख्या बहिणींनी भावाचा जीव (Pune Crime News) घेतल्याची भयावह घटना घडली आहे. या घटनेमुळे बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासली आहे. महत्त्वाचे म्हणजे बहिणीने वाद झाला त्यावेळी रागात 'तुला पोरं बोलवून ठोकतेच', अशी धमकी दिली होती. अखेर बहिणीने ते शब्द खरे केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करत होते.
याप्रकरणी संजीवनी जयंत कोमकर (रा. 309, नाना पेठ) जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड (रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अनिकेत दूधभाते (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम (रा. धनकवडी) सागर पवार (रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ) सॅम ऊर्फ समीर काळे यांच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय 68, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला पोर देऊन...
वनराज हे सुर्यकांत आंदेकर यांचे पुत्र होते. तर, संजीवनी ही मुलगी आहे. जयंत कोमकर हा जावई आहे. वनराज आंदेकरांचे 1 सप्टेंबर रोजी आकाश सुरेश परदेशी याच्याशी वाद झाले होते. आरोपी तक्रार देण्याकरीता समर्थ पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी शिवम आंदेकर आणि वनराज आंदेकर हे देखील पोलीस ठाण्यात गेले. तेथे आरोपी संजीवनी आणि जयंत यांनी आकाशला मारहाण केली. हे भांडण शिवम आंदेकर यांनी सोडवले. त्यावेळी संजीवनी हिने वनराज यांना 'वनराज... 'तुला पोरं बोलवून ठोकतेच. आमचे दुकान पाडण्यास सांगून आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावून ठोकतेच.' अशी धमकी दिली.
गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून
नगरसेवक असताना वनराज यांनी सांगितल्यामुळे आरोपींच्या दुकानावर अतिक्रमण विभागावर कारवाई झाल्याचा आरोपींना संशय होता. त्या कारणावरुन कट रचत चिथावणी देत वनराज यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
वनराज आंदेकरांच्या 'मारक्या' बहिणींना अटक, प्रॉपर्टीसाठी दिली सख्ख्या भावाची सुपारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
