Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
Samay Raina : इंडियाज गॉट लेटेन्ट फेम समय रैनाला सायबर पोलिसांनी दुसर्यांदा समन्स बजावले आहे.

Samay Raina : यूट्यूबर समय रैनाने (Samay Raina) त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 'इंडियाज गॉट लेटेन्ट' (India's Got Latent) या शोचा नवा भाग काही दिवसांपूर्वी अपलोड केला होता. या भागात प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) कॉमेडियन्सच्या पॅनेलमध्ये बसलेला होता. त्याने विनोद करताना पालकांवर एक आक्षेपार्ह विधान केले होते. रणवीरच्या विधानानंतर इंटरनेटवर तसेच संपूर्ण भारतातून संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने समय रैना, रणवीर अलाहबादियासह ३० जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समय रैनाला दुसर्यांदा समन्स बजावले आहे.
युट्यूबवरील 'इंडियाज गॉट लेटेन्ट'मध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानाने समय रैनाच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांसह सायबर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून रणवीरच्या विधानानंतर या शोमध्ये इतर युट्यूबर्संनी केलेली विधानेही व्हायरल होत आहेत. पोलिसांनी या शो मध्ये गेस्ट म्हणून सहभागी झालेल्या 30 जणांना आता पर्यंत समन्स बजावले आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये रणवीर अल्लाबदिया, आशिष चंचलानी आणि अपूर्व माखिजा यांचा समावेश आहे. ज्यांनी पॅनेलिस्ट म्हणून शोमध्ये भाग घेतला होता, तसेच हा कार्यक्रम ज्या स्टुडिओमध्ये झाला होता त्या स्टुडिओचे मालक बलराज घई तसेच या शोशी संबंधित तीन तांत्रिक लोकांचेदेखील जबाब नोंदवण्यात आले आहे.
समय रैनाला दुसऱ्यांदा बजावले समन्स
तर समय रैना सध्या परदेशात असल्यामुळे त्याच्या वकिलांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अवधी मागितला होता. मात्र, आता समय रैनाला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. समय रैना याला पोलिसांनी 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
समय रैनाचा मोठा निर्णय
दरम्यान, समय रैनाची या प्रकरणावर आता प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने 'एक्स'वर म्हटले आहे की, सध्या जे काही घडत आहे, ते माझ्या आवाक्याबाहेर आहे. माझ्याकडून ते हाताळले जात नाहीये. मी इंडियाज गॉट लेटेन्ट या शोचे सर्व भाग यूट्यूबवरून हटवले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा, हाच माझा यामागचा उद्देश होता. मी चौकशीसाठी सर्व संस्थांना सहकार्य करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
