Suresh Dhas : सरकारकडून मनोज जरांगेंना मोठी आश्वासनं, सुरेश धसांनी सर्वकाही वाचून दाखवलं
Suresh Dhas, जालना : सरकारकडून मनोज जरांगेंना मोठी आश्वासनं, सुरेश धसांनी सर्वकाही वाचून दाखवलं

Suresh Dhas, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरु असताना आता सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना मोठी आश्वासनं देण्यात आली आहे. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सरकारकडून देण्यात आलेली आश्वासनं वाचून दाखवली आहेत. सुरेश धस यांनी कोणती आश्वासनं वाचून दाखवली हे पाहूयात..
1) न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
2) हैदराबाद गॅझेटियार तपासून शिंदे समितीकडून अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले आहे..
3) मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरी त्यांनी स्वतः सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती त्यांनी मान्यता दिली आहे.
4) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावरील दाखल झालेले केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाचे निदर्शनानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल(गंभीर स्वरूपाच्या केसेस वगळता बाकीच्या केसेस मागे घेणे बाबत सरकारने सकारात्मकता दाखवली आहे)
कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षा मार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल. उपोषण मागे घेण्याची शासनाच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे..
मनोज जरांगे पाटील काय काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, काही लोक म्हणत आहेत की काय मिळालं आपल्याला त्यांच्या 24 घंटे एकच धंदा आहे, त्यांना काही करायचे नाही...शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती..शिंदे समितीचे मंत्रालयावरच ऑफिस त्याला कुलूप लावण्यात आलं होतं,..जे काय मिळालं म्हणत होते ना घरात बसून नेत्यांचे पाय चाटणाऱ्यांना कळत नाही, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी समन्वयकांना लगावलाय.
शिंदे समिती राज्यात काम करणार आहे...पूर्ण राज्य आमचं आहे....बीड आणि धाराशिव अधिकारी जातीवादी आहेत... ते प्रमाणपत्र देत नाहीत.. त्यांना बडतर्फ केलेलच बरं. गेल्या वर्षी मोडी लिपी अभ्यासकांना पैसे न दिल्यामुळे ते काम सोडून आपापल्या घरी गेले..आमच्याकडे काही अभ्यासक आहेत त्यांना अधिकार द्या, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
