एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?

Nashik Crime : मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्री रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तरुण-तरुणींच्या टोळक्यावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Nashik Crime : मद्यधुंद अवस्थेत रविवारी मध्यरात्री रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तरुण-तरुणींच्या टोळक्यावर अखेर पोलिसांनी (Nashik Police) कारवाई केली असून सात ते आठ जणांविरोधात गंगापूर रोड पोलीस ठाण्यात (Gangapur Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कारवाई करण्यास विलंब केल्याने गंगापूर रोडचे पोलीस निरीक्षक सुशील जमुडे (Sushil Jumde) यांची नियंत्रण कक्षात (Control Room) बदली करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ (Prasad Circle) एक क्लबमधून नाईट पार्टी करून मद्याच्या नशेत रस्त्यावर काही युवक आणि युवती धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्ती पथक दाखल झाले होते. यावेळी एका युवकाने तसेच एका युवतीने पोलिसांशी अरेरावी केली. या युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

'त्या' युवतीसह युवकांवर गुन्हा

गंगापूरच्या पोलिसांशी हुज्जत घालत जप्त केलेली गाडीची चावी मागत पोलिसांनाच कायद्याचे धडे शिकविणाऱ्या या युवतीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नव्हती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर अशोक साळवे (30, रा. पवननगर, सिडको), वैशाली वाघमारे (नाशिकरोड) भूमी ठाकूर (19, रा. भाभानगर), आल्तमश शेख (वडाळागाव), दोन बाऊन्सर यांच्याविरुद्ध तसेच हॉटेलचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गंगापूरच्या पोलीस निरीक्षकांचीही तडकाफडकी बदली 

पोलिसांनी या युवकांवर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep karnik) यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची कंट्रोल रूमला बदली केली आहे. जगवेन्द्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली होती, मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : नाशिकमध्ये बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास

Nashik Crime News : भर रस्त्यात तरुणीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी; सलग दोन दिवसात दोन घटनांनी नाशिक हादरलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हॉस्टेलच्या वादातून लातूरमध्ये हाणामारी, तरुणाचा भोसकून खून, तर दोन जण जखमी, चार जणांना अटक
हॉस्टेलच्या वादातून लातूरमध्ये हाणामारी, तरुणाचा भोसकून खून, तर दोन जण जखमी, चार जणांना अटक
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Beed : सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारी, बीडच्या आष्टीत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारी, बीडच्या आष्टीत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Embed widget