Ind vs Pak Video : 'टीम इंडियाच्या विजयामागे जादुटोना', पाकिस्तानमध्ये लवलं जातंय भलतंच लॉजिक; म्हणतात, 'भारताने दुबईत 22 पंडित...'
India vs Pakistan Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानी माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले.

Team India Won because Black Magic in Dubai : एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपले वर्चस्व कायम राखत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 6 विकेटने बाजी मारली. प्रथम फलंदाजी केलेल्या पाकिस्तानला 49.4 षटकांत 241 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने 42.3 षटकांमध्ये 4 बाद 244 धावा केल्या. स्टार फलंदाज विराट कोहलीने 51 वे एकदिवसीय शतक झळकावताना 111 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 100 धावा केल्या. यासह यजमान पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हानही संपल्यात जमा झाले असून, भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.
हा पराभव पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या चाहत्यांच्या खुप जिव्हारी लागला, कारण पाकिस्तानसाठी आता उपांत्य फेरीचे दरवाजे जवळजवळ बंद झाले आहेत. एकीकडे, सीमेच्या दुसऱ्या बाजूला असलेले लोक निराश दिसत होते, तर भारतीय चाहत्यांनी मोठ्या उत्साहाने फटाके फोडले. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक पाकिस्तानच्या पराभवावर चर्चा करताना दिसत आहेत. या दरम्यान एका व्यक्तीने असा दावा केला की, टीम इंडियाने काहीतरी जादूटोणा करून पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
टीम इंडियाच्या विजयामागे जादुटोना?
या पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान, एका व्यक्तीने सांगितले की, भारतीय संघाने त्यांचे 22 पंडित दुबई स्टेडियममध्ये पाठवले होते. असा दावा करण्यात आला होता की, काळी जादू करणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूमागे दोन पंडित होते. आणि टीम इंडिया पाकिस्तानात येऊ इच्छित नव्हती, कारण जर ते येथे आले असते तर ते पंडितांना त्यांच्यासोबत आणू शकले नसते आणि या 22 पंडितांनी मिळून 11 पाकिस्तानी खेळाडूंचे लक्ष विचलित केले आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
सोशल मीडिया पर वायरल पाकिस्तान के किसी चैनल के इस शो को देखिए, पैनल डिस्कशन में ये पढ़े लिखे लोग टीम इंडिया की दुबई में पाकिस्तान की जीत को जादू टोना से मिली जीत बता रहे हैं!! इनके दिमाग में हार का तगड़ा झटका लगा है!!! #Indiapakistan pic.twitter.com/Kjjb2ctmVx
— Ratish Trivedi/रतीश त्रिवेदी (@RatishShivam) February 24, 2025
या पॉडकास्टवरील चर्चा इथेच थांबली नाही. एका व्यक्तीने आतील बातम्यांचा हवाला देत सांगितले की, सामन्याच्या एक दिवस आधी भारताने 7 पंडितांना मैदानावर पाठवले होते, तोपर्यंत भारतीय संघ मैदानावर पोहोचला नव्हता. पंडितांनी केलेल्या जादूनंतरच भारतीय संघ मैदानात आला, असेही म्हटले जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतून पाकिस्तान आऊट!
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होऊन फक्त 5 दिवस झाले आहेत. यजमान संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्यांना भारताकडून सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
हे ही वाचा -





















