Chhaava Box Office Collection : दहाव्या दिवशीही 'छावा'चा बोलबाला! कमाईच्या बाबतीत पार केला 300 कोटींचा टप्पा; आतापर्यंत किती कमाई केली?
Chhaava Box Office Collection : छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Chhaava Box Office Collection Day 10 : सध्या छावा या हिंदी चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी कमाईचा 300 कोटींचा आगडा पार केला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट विकी कौशलच्या (Vicky Kaushal) करिअरमधील सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाने कमवले 300 कोटी रुपये
Sacnilk च्या रिपोर्टनुसार छावा या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 326.75 कोटी रुपये कमवले आहेत. दहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे सध्यातरी अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. पण आतापर्यंतच्या कमाईच्या आधारावर या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हा चित्रपट लवकरात लवकर 300 कोटी रुपये कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत जाऊन बसला आहे. या यादीत पुष्पा-3, जवान, पठाण, अॅनिमल, गदर-2 स्त्री-2 , बाहुबली-2 आदी चित्रपटांचा समावेश आहे.
कोणत्या दिवशी किती कमाई केली?
या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 37 कोटी रुपयांचा गल्ला मजवला होता. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने 48 कोटी रुपये कमवले आहेत. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 24 कोटी रुपये कमवले आहेत. या चित्रपटाने पाचव्या दिवशी 25.25 कोटी, सहाव्या दिवशी 32 कोटी, सातव्या दिवशी 21.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण 219.25 कोटी रुपये कमवले. तर आठव्या दिवशी या चित्रपटाने 23.5 कोटी रुपयांची कमाई केली. नवव्या दिवशी या चित्रपटाने 44 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
View this post on Instagram
विकी कौशलच्या कोणत्या चित्रपटांनी किती कमाई केली?
विकी कौशलने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये छावा हा चित्रपट सर्वांत मोठा ठरला आहे. या चित्रपटाने 300 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. याआधी त्याच्या उरी या चित्रपटाने 245.36 कोटी रुपये कमवले होते. त्याच्या सॅम बहाद्दूर या चित्रपटाने 92.98 कोटी रुपये कमवले होते. हा चित्रपट हिट ठरला होता. त्याच्या राजी या चित्रपटाने 88 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता.
हेही वाचा :
25 तारखेला लग्न, त्याआधी तुफान धम्माल-मस्ती, प्राजक्ता कोळीचे प्री-वेडिंगचे फोटो पाहिलेत का?
दारू पिऊन आले, फुकट 'छावा' दाखवा म्हणून अरेरावी, जालन्यातील सिनेमागृहात धुडगूस; CCTV आला समोर!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
