एक्स्प्लोर

PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 शेतकऱ्यांना मिळणार, खात्यात पैसे न आल्यास काय करावं?

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये देशभरातील शेतकऱ्यांना आज वितरित केले जातील. 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल.

PM Kisan Samman Nidhi  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचं वितरण करणार आहेत. 19 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती. पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याचे 2000 रुपये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात जारी करण्यात आले होते. आता बिहार राज्यातील भागलपूरमधून पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहेत.  देशातील या योजनेतील 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवले जातील. म्हणजेच केंद्र सरकार एकूण 21000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. ही योजना केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते. 

पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार

आज देशभरातील 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये दिले जाणार आहेत. केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास विभागाकडून या कार्यक्रमाचं आयोजन बिहारमध्ये राज्य सरकारच्या सहकार्यानं भागलपूर जिल्ह्यात करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आज जवळपास 21000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. जे शेतकरी पीएम किसान योजनेचे पहिल्यापासून सदस्य आहेत त्यांना आजच्या हप्त्यासह 38000 रुपये मिळतील. 

पीएम किसानचे 2000 रुपये खात्यात न आल्यास काय करायचं?

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये खात्यात न आल्यास शेतकऱ्यांना काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटला जाऊन ई केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या हप्त्याचे 2000 रुपये दिले जातात. एखाद्या शेतकऱ्याची ई केवायसी करायची राहिली असेल तर त्यानं ती करुन घेणं आवश्यक आहे. याशिवाय संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पर्याय चालू आहे का हे तपासून पाहणं आवश्यक आहे. जर हा पर्याय बंद असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळं डीबीटी सक्रिय करुन ठेवणं आवश्यक आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेला लाभ पात्र शेतकऱ्यांकडून घेतला जावा यासाठी केंद्र सरकारचं कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालय प्रयत्नात आहे. यासाठी ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे जमीन असूनही त्याची नोंद झाली नसल्यास पैसे मिळणं बंद होऊ शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांकडे जमीन असल्याची पडताळणी देखील होणं आवश्यक असतं. जमीन पडताळणी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ज्या हप्त्यांची रक्कम मिळाली नसेल ती नंतर दिली जाते. 

इतर बातम्या: 

PM Kisan : 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 येणार, नरेंद्र मोदी पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करणार, 21000 कोटी पाठवणार

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget