![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : सुनंदा पवार यांचा सर्वात मोठा आरोप, बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होण्याचा दावा!
Sunanda Pawar on Baramati Loksabha : आज बारामतीच्या (Baramati) प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोक फिरताना दिसत आहेत आणि वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल.
![मोठी बातमी : सुनंदा पवार यांचा सर्वात मोठा आरोप, बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होण्याचा दावा! Sunanda Pawar's biggest allegation, claim of use of Money in last two days in Baramati Loksabha Maharashtra Politics Ajit Pawar Supriya Sule Sunetra Pawar Marathi News मोठी बातमी : सुनंदा पवार यांचा सर्वात मोठा आरोप, बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होण्याचा दावा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/4a245ed4971af97193f0cf07b73b72f11714042287267924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunanda Pawar on Baramati Loksabha : "आज बारामतीच्या (Baramati) प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोक फिरताना दिसत आहेत आणि वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल. ", असा दावा आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत सुनंदा पवार बोलत होत्या.
नणंद भावजय आमने-सामने
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय आमने-सामने आल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबात संघर्ष वाढलाय. अजित पवार यांचं कुटुंब सोडलं तर पवार कुटुंबातील इतर सदस्य सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच घेरल्याच चित्र आहे.
पवार कुटुंबात संघर्ष पेटला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पवार कुटुंबामध्ये देखील संघर्षाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे. काही आठवड्यांपासून अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंसाठी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यानंतर अजित पवार चांगलेच आक्रमक झाले होते. आमचे थोरले बंधू लोकांची दिशाभूल करतात. रोहित पवार यांना हडपसर मधून निवडणूक लढवायची होती. तेव्हा ते माझ्याकडे आले होते. मात्र, पवार साहेबांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर प्रतिभाकाकींना रोहितला काही सल्ले दिले, असा खुलासा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
काका पुतण्यांमध्ये आरोप प्रत्यारोप
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर आरोप केले होते. आमचा पहाटेचा शपथविधी पार पडला. त्यापूर्वी आमची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे पहाटेचा शपथविधी झाला, असं अजित पवार म्हणाले होते. त्याला शरद पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आमच्या बैठका झाल्या पण आम्ही भाजपसोबत शेवटपर्यंत गेलो नाही, बैठका घेणं वेगळं आणि भाजपसोबत प्रत्यक्ष जाणे वेगळे, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मुंबईतील दोन जागांवर काँग्रेसला उमेदवार मिळेना, तर ठाणे-नाशिकसह सहा ठिकाणी महायुतीचा घोळ कायम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)