एक्स्प्लोर

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र

Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मतदारांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

Eknath Shinde Letter मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर मतांच्या माध्यमातून जो स्नेहाचा वर्षाव केला, जो विश्वास दाखवला तो आम्ही कधीही विसरणार नाही,असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.    

एकनाथ शिंदे यांचं पत्र जसंच्या तसं

प्रिय मतदार, 
बंधु आणि भगिनींनो.. 

विधानसभा निवडणुकांच्या निकालात आपण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या पदरात भरभरून दान दिलं. आपणाला कोटी कोटी धन्यवाद... आपण शिवसेनेसह महायुतीच्या घटकपक्षांवर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू. 

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला मतदारांनी दिलेला कौल हा आम्ही गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासामुळे मिळाला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वसा, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आम्हाला मिळत असलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे महायुती अधिकच भक्कमपणे कार्य करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारत संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी महायुती 24x7 कार्यरत राहील. 

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेना महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केला आहे तो आम्ही कधीच विसरणार नाही. आपला महाराष्ट्र देशात सदैव अग्रेसर राहण्यासाठी आमचा यापुढेही प्रयत्न राहील. 

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची कार्यपद्धत आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सामाजिक पाया भक्कम करतानाच राज्यातील महिला, युवा, शेतकरी गरिबांच्या कल्याणासाठी भविष्यातअधिक जोमाने काम करण्याची ताकद आपण आम्हाला दिली आहे. आम्ही आपल्या ऋणात राहून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी झटत राहू, अशी ग्वाही यानिमित्ताने देतो. 

या निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे.महायुती सरकारने अडीच वर्षात केलेलं काम गावोगावी, नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचं काम शिवसैनिक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. 

रात्रीचा दिवस करून आपण टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्हाला आपलं भक्कम पाठबळ मिळालं आहे. चला महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा सज्ज होऊया... पुनश्च एकदा आपले आभार...

दरम्यान, महायुतीमध्ये भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर यश मिळालं आहे. आता राज्याचं मुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

इतर बातम्या :

Sreehari Aney : मविआतील तीन पक्षांना एकत्रित विरोधी पक्षनेता मिळणार? कायदा काय सांगतो? श्रीहरी अणेंनी केलं स्पष्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget