एक्स्प्लोर

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा

Maharashtra Solapur Election : जिल्ह्यातील करमाळा, माढा, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण या मतदारसंघामध्ये मतदान, मतमोजणीमधील आकडेवारीच्या तफावतीबाबत प्रशासनाने खुलासा केला आहे.

सोलापूर: जिल्ह्यातील विविध मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएममध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याच्या बातम्या बाहेर आल्यानंतर प्रशासनाने आज यावर खुलासा केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 244-करमाळा, 245- माढा, 249—सोलापूर शहर मध्य, 251- सोलापूर दक्षिण या मतदार संघामध्ये मतदान व मतमोजणी मधील आकडेवारीत तफावत दिसून आली होती. 

यातील 244- करमाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 29 हजार 375 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 29 हजार 377 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची वाढ ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.115 यांनी नमुना 17 सी मध्ये मतांचा हिशोब लिहिताना चुकीची नोंद घेतल्याने झाली. सदरची मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून आल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 

245-माढा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 67 हजार 691 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 67 हजार 21 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 670 मताची घट आढळून आली. सदरील बाब ही केंद्र क्र.149 केंद्राध्यक्ष यांनी मॉकपोल वेळी नोंदवलेली मते CRC न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे हस्त पुस्तिकामधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवाराची मतांची तफावत ही सदर केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतापेक्षा अधिक असल्यामुळे सदर केंद्राची 670 मते मतमोजणी दिवशी मोजली नाहीत.  त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून आल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे. 

249-सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 291 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. मात्र मतमोजणी दिवशी 2 लाख 289 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची घट आढळून आली. सदरील बाब ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.197 यांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये 2 प्रदत्त मते ईव्हीएम मतांच्या हिशोबात गृहीत धरल्याने 665 मते नमुद केली . मात्र मतमोजणीच्या दिवशीच्या ईव्हीएम मध्ये 663 मते आढळून आली. सदरील मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

251-सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 23 हजार 624 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 23 हजार 625 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 1 मताची वाढ दिसून आली. सदरील बाब केंद्राध्यक्ष यांनी 1 ईलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट चे मत गृहीत न धरल्यामुळे 676 मते असा हिशोब केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये नमुद केला. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मध्ये 677 मते आढळून आले. सदरील मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

ही बातमी वाचा: 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget