एक्स्प्लोर

Ajit Pawar: ...आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का? : अजित पवार

Ajit Pawar : यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना वाढवलं, नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला सोडून शरद पवार गेलेच ना? असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला आहे

 पुणे :  शिरुरमध्ये धरण आहे. पाणी आपल्या उशाशी आहे, मात्र काही जण पाणी पळवून नेत आहेत.जुन्नर आणि आंबेगावला  जेवढी पाण्याची गरज आहे, तेवढच ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हर फ्लोचे पाणी घेऊन जा. परंतु आता खालून बोगदा काढला तर  उन्हाळ्यात आम्ही  आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का? असे म्हणत उपुमख्यमंत्री अजित पवारांनी आमदार रोहित पवारांवर (Ajit Pawar On Rohit Pawar)  निशाणा साधला आहे. शिरुरमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावांच्या (Shivajirao Adhalrao Patil)  प्रचारासाठी अजित पवारांची आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाहीर सभा  झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना वाढवलं, नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला सोडून शरद पवार गेलेच ना? असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.  अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हणा  साहेबांच्या विचारधारेला सोडून ते गेलेच ना? पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात स्वतः लिहिलं आहे. मी 35  वर्षे साथ दिली. पण आता मी 60 च्या वर गेलो, कधीपर्यंत थांबायचं मी आता.. मी अनेक वेळा साहेबांना सांगितले होते.  

कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला

शिवरायांची भूमिका ते अगदी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका,समाज व्यसनाधीन होईल  अशा जाहिराती करून आपलं पोट भरू नये, असे म्हणत शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला लगावला आहे.

मी आई सोबत मतदानाला गेलो तरी हे राजकारण करतात, अजित पवारांची खंत 

बारामतीत मी आई सोबत मतदानाला गेलो. आता मी ज्या आईच्या पोटी जन्माला आलो, तिला सोबत घेऊनच मतदानाला जाणार ना? बरं पहिल्यांदाच गेलो असं आहे का? प्रत्येक मतदानाला माझी आई माझ्यासोबत मतदानाला येते. यांच्या पोटात आत्ताच का दुखलं? म्हणाले दादा राजकारण करत आहेत. आता यात कसलं राजकारण आलं. आईने मला सांगितलं, आपण दोघांनी सोबतच जायचं, म्हणून प्रत्येकवेळी प्रमाणे आम्ही मतदान केलं. 

रडून प्रश्न सुटणार : अजित पवार

आढळरावांना लोकसभेला आणि दिलीप वळसे पाटलांना विधानसभेला असं मतदान तुम्ही आजवर करत आले ना? आता बाबांनो असं काही करू नका. आत्ताचे खासदार काहीही कागदपत्रे दाखवतात अन् म्हणतात मी अजित दादांकडे पाठपुरावा केला. गडी अलीकडच्या तारखा टाकतोय अन् कागद नाचवतोय. धादांत खोटं बोलतो हा माणूस. मी प्रत्येकाची कामं नक्की करतो. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांना विचारा, ते विरोधात असताना ही मी कामं करायचो. कारण उद्या ते आपल्याकडे परत ही येतील, शेवटी राजकारण आहे.आता लक्षात ठेवा हे भावनिक करतील, आता माझा पुतण्या बारामतीत लढला. तर रडून प्रश्न सुटणार आहेत का? तुमचे प्रश्न भावनिकतेने सुटणार नाही, असे देखील अजित पवार म्हणाले.  

पदाशिवाय काही नाही : अजित पवार 

पद गेल्यावर कोणी कोणाला  विचारत नाही असं म्हणत अजित पवारांनीराष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते   आर आर पाटील यांचे उदाहरण दिलं. अजित पवार म्हणाले, 26/11 नंतर राजीनामा देऊन आबा गावाला गेले. सहा महिन्यांनी भेटायला आले तर म्हणाले एकही भेटायला आला नाही. पदाशिवाय काही नाही. 

Video :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Murder Case : रात्री झोप येत नाही, आईकडे, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
रात्री झोप येत नाही, आई, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
Shani Shingnapur Temple : शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
Santosh Deshmukh Case : खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Walmik Karad Exposed : संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मीक कराडचABP Majha Marathi News Headlines 11.30 AM TOP Headlines 11.30 AM 01 March 2025HSRP Number Plate : राज्यात एचएसआरपी नंबर प्लेटचा वाद, तिप्पट वसुलीचा आरोपABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 01 March 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Murder Case : रात्री झोप येत नाही, आईकडे, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
रात्री झोप येत नाही, आई, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
Shani Shingnapur Temple : शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
Santosh Deshmukh Case : खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट
वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट
Uttarakhand Avalanche : बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच
बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच
kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द
Volodymyr Zelenskyy Vs Donald Trump : रशिया आमच्यासाठी खुनी! डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की भिडताच अवघा युरोप आता पाठिंब्यासाठी एकवटला; कॅनडा सुद्धा धावून आला
रशिया आमच्यासाठी खुनी! डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की भिडताच अवघा युरोप आता पाठिंब्यासाठी एकवटला; कॅनडा सुद्धा धावून आला
Embed widget