एक्स्प्लोर

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, माजी नगराध्यक्षाने संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली

Sanjay Patil vs NCP : माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे.

Sanjay Patil and NCP Crisis, सांगली : सांगलीतील कवठे महांकाळमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील  आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी एकप्रतिज्ञापत्र लिहून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. प्रतिज्ञापत्रात अय्याज मुल्ला यांनी गैरसमजुतेतून आणि गोंधळलेल्या परिस्थितीत आपण संजयकाका  विरोधात तक्रार दिल्याचे म्हटले आहे. रोहित पाटील मात्र या प्रकरणात नौटंकी करत केविलवाणा प्रयत्न करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा हा डाव उघडा पडला असल्याचे अय्याज मुल्ली यांनी म्हटलं आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांनी देखील प्रतिज्ञापत्रातून तक्रार मागे घेतली आहे. 

संजयकाका पाटलांचा रोहित पाटलांवर हल्लाबोल 

कवठे महांकाळ येथे झालेल्या घटनेचा तपशील स्वत: अय्याज मुल्ला यांनी सांगितलेला आहे. आज त्यांनी केस मागे घेतली आहे. त्यांनी अॅफिडेविटमध्ये म्हटलं आहे की, संजकाकांचा कोणताही संबंध नाही. माझा गैरसमज झाला होता. तेव्हा रोहित पाटील राजकारणात नौटंकी करत आहेत. रोहित पाटील सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते तोंडावर पडले आहेत. आज मोर्चासाठी गावागावात निरोप दिले होते. अतिशय थोडक्या माणसांमध्ये त्याला तो कार्यक्रम करावा लागला होता. मी बाहेरगावी आलेलो आहे, दोन दिवसांमध्ये मी त्यांना उत्तर देणार आहे. त्या सर्व गोष्टींचा मी खरपूस समाचार घेणार आहे. तासगाव-कवठे महांकाळमधील लोकांनी यांची नौटंकी ओळखलेली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संजयकाका पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्या घरात घूसून महिलांना आणि माझ्या आईला मारहाण केली, असा आरोप मुल्ला यांनी केला होता. मुल्ला यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर संजयकाका पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे संजयकाका पाटील यांचे स्वीय सहाय्यक खंडू होवाळ यांनी अय्याज मुल्ला यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता दोन्ही बाजूंनी तक्रारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत, तर दुसरीकडे संजयकाका पाटील दोन दिवसांनी निषेध सभा घेणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Election Commission : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिपाणीमुळे फटका,चिन्हाबाबत कोणता निर्णय घेणार? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget