एक्स्प्लोर

खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet portfolio : महायुती मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कोणती खाती मिळाली? जाणून घ्या...

Shiv Sena Portfolio Distribution : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. भाजपमधील 19, शिंदेंच्या शिवसेनेतील 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 9 नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झाले नव्हते. मंत्रिमंडळाचे खातेवाटप नेमके कधी जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच अखेर महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे. त्यामध्ये, अखेर गृह मंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिले आहे. 

महायुतीच्या आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडा लोटला होता. त्यात आज हिवाळी अधिवेशनचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे खातेवाटप कुठं रखडलंय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी मोठ्या घडामोडी दिसून आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार चहापानासाठी पोहोचले होते. यामुळे खातेवाटप आजच जाहीर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच महायुतीच्या काही आमदारांनी खातेवाटप आजच जाहीर होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे खातेवाटप नेमके कधी जाहीर होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र आता प्रतीक्षा संपली असून महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे.

एकनाथ शिंदेंकडे कोणकोणत्या खात्यांची धुरा?

नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग.

शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठली खाती?

कॅबिनेट मंत्री

1.उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा

2.प्रताप सरनाईक - वाहतूक

3.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

4.भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास

5.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

6.दादा भूसे - शालेय शिक्षण

7.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

8.संजय राठोड - मृदा व जलसंधारण

9.संजय शिरसाट - सामाजिक न्याय

राज्यमंत्री

10. योगश कदम -  ग्रामविकास, पंचायत राज

11. आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा  (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 
7.गणेश नाईक -  वन
8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9.संजय राठोड - मृदा व जलसंधारण 
10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल - विपणन, राजशिष्टाचार 
14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन 
15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा 
16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 
19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 
21.शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
22.माणिकराव कोकाटे - कृषी 
23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे - टेक्स्टाईल 
26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 
27.प्रताप सरनाईक - वाहतूक 
28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन, मिठागरे विकास 
29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 
31.आकाश फुंडकर - कामगार 
32.बाबासाहेब पाटील - सहकार 
33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री  (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 
35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 
38. योगेश कदम  - गृहराज्य शहर
39. पंकज भोयर - गृहनिर्माण,गृहराज्य ग्रामीण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023Navjot Singh Sidhu Speech Manmohan Singh : नवज्योतसिंग सिद्धूचं गाजलेलं भाषण पुन्हा व्हायरलSuresh Dhas on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस तिथेच होते,धस यांचा दावा, संबंध काय आज सांगतो!Manmohan Singh Funeral : डॉ. मनमोहन सिंग पंचतत्वात विलीन, दिग्गजांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Embed widget