एक्स्प्लोर

देशातील सर्वात मोठ्या बँकेला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, 94000 रुपये भरण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाबाबात (SBI) एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला मोठा दणका दिला आहे. न्यायावयानं SBI ला 94000 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

Supreme Court : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाबाबात (SBI) एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला मोठा दणका दिला आहे. न्यायावयानं SBI ला 94000 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, एसबीआयला सर्वोच्च न्यायालयाने का फटकारले? 94000 रुपये देण्यामागचं कारण काय? SBI च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात कोणी याचिका दाखल केली? नेमकं प्रकरण काय याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. काय आहे हे संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेऊ.

नेमकं प्रकरण काय?

आसाममधील एका व्यक्तीने 2021 मध्ये लुई फिलिप ब्लेझर विकत घेतला होता. मात्र, त्याला तो आवडत नसल्यानं त्याने परत करण्याचा विचार केला. मात्र, लुई फिलिपची वेबसाईट हॅक झाली होती. फसवणूक करणाऱ्याने या व्यक्तीशी संपर्क साधला आणि स्वत:ची ओळख लुई फिलिपचे ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून दिली. फोनवर ॲप इन्स्टॉल केले असेल तरच ब्लेझर परत करता येईल, असे त्यांनी सांगितले. हे ॲप इन्स्टॉल होताच फसवणूक करणाऱ्याने त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे केले. त्यानंतर त्या व्यक्तीनं तत्काळ एसबीआयच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला होता. तसेच तक्रार दाखल केली होती. यानंतर कार्ड आणि खाते ब्लॉक करण्यात आले. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात एफआयआर देखील दाखल केले होते. आसाम पोलिसांच्या सायबर क्राइम सेलमध्ये तीन तक्रारी केल्या होत्या. मात्र, याबाबत काहीही न झाल्यानं त्यांनी प्रथम आरबीआय लोकपाल आणि नंतर गुवाहाटी उच्च न्यायालयात आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला होता.

ग्राहक बेफिकीर असल्याचा SBI ने केला होता आरोप

संबधीत व्यक्तीची 94000 रुपयांची फसवणूक झाली होती. भारतातील सर्वात मोठी बँक SBI ने सायबर गुन्ह्याची तक्रार केली नाही किंवा चार्जबॅकची विनंती केली नाही. ग्राहक बेफिकीर असल्याचा आरोप त्यांनी केला होता. एवढेच नाही तर गुगल पेच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे एसबीआयने म्हटले होते. त्यामुळं बँक जबाबदार नाही. गुगल पे हे थर्ड पार्टी ॲप असल्याचे बँकेने म्हटले आहे. बँक कधीही थर्ड पार्टी ॲप्स वापरण्याचा सल्ला देत नाही असे म्हटलं होते.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

फसवणूक झालेल्या आसामच्या संबंधीत व्यक्तीने एसबीआयविरुद्ध आरबीआय बँकिंग लोकपाल, गुवाहाटी उच्च न्यायालयात आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात खटलाही दाखल केला. आरबीआय लोकपालाकडे यळ न आल्यानं त्याने गुवाहाटी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं एसबीआयला 94000 रुपये पूर्ण भरण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, SBI कडे आजकाल सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे. तरीही सायबर फसवणूक रोखण्यात अपयश आले आहे. संबंधीत व्यक्तीने 24 तासांच्या आत फसवणुकीची माहिती एसबीआयला दिली होती. त्यामुळं बँकेने तातडीने कारवाई करायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यावर्षी किती वाढणार दर?
29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यावर्षी किती वाढणार दर?
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
चीनच्या बाजारपेठांमध्ये 'मेड इन इंडिया'ची क्रेझ, अमेरिकेला झटका देत चीन ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, निर्यातीत मोठी वाढ
चीनच्या बाजारपेठांमध्ये 'मेड इन इंडिया'ची क्रेझ, अमेरिकेला झटका देत चीन ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, निर्यातीत मोठी वाढ
Gold Silver Price Today: 10 ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या पार; चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
10 ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या पार; चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget