India Squad Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी असणार भारतीय टीम; रोहितच्या लाडक्याची सरप्राईज एन्ट्री?
19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होणार आहे. याआधी भारताला इंग्लंडविरुद्ध 3 वनडे आणि 5 टी-20 मालिका खेळायच्या आहेत.
India Squad for ICC Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होणार आहे. याआधी भारताला इंग्लंडविरुद्ध 3 वनडे आणि 5 टी-20 मालिका खेळायच्या आहेत. यासाठी भारतीय संघ लवकरच जाहीर केल्या जाऊ शकतो, जवळपास तोच संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही उतरणार आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या टी-20 वर्ल्ड कपनंतर गौतम गंभीर प्रशिक्षक बनला आणि त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताने श्रीलंकेविरुद्ध केवळ 3 एकदिवसीय मालिका खेळली, ज्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. अशा स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडणे निवडकर्त्यांना सोपे जाणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे. त्याचबरोबर बदल करण्याची परवानगी 13 फेब्रुवारीपर्यंत देण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे बोलायचे झाले तर, फलंदाजीची फळी जवळपास निश्चित आहे. यशस्वी जैस्वालला टॉप ऑर्डरमध्ये बॅकअप सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. यशस्वीने टी-20 आणि कसोटीत सलामीवीर म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. आता त्याची नजर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून कायमस्वरूपी स्थान मिळवण्यावर आहे आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीची ही सुरुवात असू शकते.
🚨 YASHASVI JAISWAL IN ODIs 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) January 7, 2025
- Jaiswal is likely to be in the ODI series against England & Champions Trophy as Backup opener. [RevSportz] pic.twitter.com/zk5ulM3reW
यशस्वी असणार बॅकअप ओपनर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा बॅकअप म्हणून यशस्वी जैस्वाल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा भाग असेल. यशस्वी 2023 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप संघाचा भाग नव्हता. त्याच्या जागी इशान किशनला प्राधान्य देण्यात आले होते आणि शुभमन गिल डेंग्यूने त्रस्त असल्याने इशान काही सामने खेळला. पण, आता इशान यामधून बाहेर आहे आणि यशस्वी बॅकअप सलामीवीर असेल.
नितीश रेड्डीची होणार सरप्राईज एन्ट्री?
आणखी एक नाव पुढे आले आहे ते म्हणजे नितीश कुमार रेड्डी. यशस्वीप्रमाणेच या अष्टपैलू खेळाडूनेही कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात त्याच्या स्थानाबाबत बीसीसीआय अजूनही अनिश्चित आहे. नितीश रेड्डी निवडल्यास तो हार्दिक पांड्याचा बॅकअप म्हणून जाईल, परंतु मुख्य 15 चा भाग नसून तो प्रवासी राखीव खेळाडू असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी असणार भारतीय टीम : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार/दुखापतीवर अवलंबून), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्यE/नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
हे ही वाचा -