एक्स्प्लोर

Maha Vikas Aghadi : ईव्हीएमच्या विरोधात मविआची हायकोर्टात धाव; विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा ठपका, राज्यभरात याचिका

Maha Vikas Aghadi : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मतदानाविरोधात तसेच ईव्हीएम मशीन, मतदार यादीतील फेरफार केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून हायकोर्टात धाव घेण्यात येणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मतदानाविरोधात तसेच ईव्हीएम मशीन, मतदार यादीतील फेरफार केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून हायकोर्टात धाव घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात मविआतील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, मनोहर मढवी, नरेश मनेरा यांच्या कडून निवडणुकी विरोधात याचिका दाखल करणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मुंबईमध्ये 38, औरंगाबादमध्ये 17 तर नागपूरात 12 केसेस दाखल करण्यात आल्या असून आणखी जवळपास शंभर केसेस दाखल होणार असल्याची शक्यता आहे.  

विधानसभा निकालावर आणि आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात पहिल्यांदाच एवढा मोठ्या संख्येनं कोर्टात याचिका दाखल होणार आहे. दरम्यान, मतदार यादीत खूप मोठा घोळ होऊन त्यामुळे संशयात भर पडल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. ईव्हीएमचा निवडणुकीत वापर, तसेच धर्माच्या आधारे मत घेण्यात आल्याचेही याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. तसेच पैशाचा वापर करत मतदान करण्यात आल्याचा आणि त्या संदर्भात पुरावेही याचिकेत जोडण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं ऐनवेळी बदलले निर्णय दबाव पोटी असल्याचाही या याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. निवडणूक पारदर्शक झालेली होती, तर त्यामध्ये सीसीटीव्ही का दिले नाहीत? असा सवालही याचिकेतून विचारण्यात आला आहे.

मविआच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

दोन दिवसांआधी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीला आव्हान देण्यात आले होते. यात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत प्रफुल गुडधेसह यशोमती ठाकूर, सुभाष धोटे, गिरीश पांडव, राजेंद्र शिंगणे, शेखर शेंडे, संतोष सिंग रावत यांनी याचिका दाखल केली होती. निवडणुकीत नियमाचे मोठ्याप्रमाणत उल्लघन झाले. तसेच ईव्हीएम छेडखानी झाली, मतदार याद्यात घोळ, व्हीव्हीपैड फेरमोजणीला प्रतिबंध यासह अनेक मुद्दे या याचिकेत मांडण्यात आले. दरम्यान आज याच मुद्याला पुढे नेत मविआच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

काटोलचे पराभूत उमेदवार सालील देशमुख, हिंगण्याचे पराभूत उमेदवार रमेश बंग, जत विधानसभा मतदार संघातील विक्रम सावंत, पिंपळी चिंववडचे राहुल कलाटे, आकोटचे महेश गनगाने आणि  बुलढाण्याच्या जयश्री शेळके या आज न्यायालयात आपली याचिका दाखल करत असल्याची माहिती पुढे आली आहे.  

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget