एक्स्प्लोर

मोईसॅनाईट स्टोन, 10 हजारांची सूट अन् 6 टक्के व्याज, लोकांना लुबाडण्यासाठी 'या' एका स्कीमचं आमिष, Torres Scam ची इनसाडईड स्टोरी! 

मुंबईत एक नवा घोटाळा समोर आला आहे. गुंतवणूकादारांना भरघोस परतावा देण्याचे आमिष देऊन तेथे लोकांची कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली आहे.

मुंबई : सध्या मुंबईतील टोरेस कंपनीच्या कथित आर्थिक घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या कंपनीने गुंतवणुकीवर घसघसीत परतावा देण्याचे आश्वासन देऊन लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातंय. हा कथित घोटाळा समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही कंपनी गुंतवणूकदारांना कशा प्रकारे लुटत होती, याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. असे असताना आता लोकांची लूट करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या आकर्षक योजनेची माहिती समोर आली आहे. 

कंपनीने सीईओला जबाबदार धरलं

 टोरेस ज्वेलरीच्या मुंबईत अनेक ठिकाणी शाखा होत्या. ग्रँट रोड, नवी मुंबई, कल्याण, मीरा रोड अशा मोक्याच्या ठिकाणी या कंपनीने आपल्या शाखा उघडल्या होत्या. मात्र हा घोटाळा समोर आल्यानंतर पोलिसांनी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे या कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कथित घोटाळ्याला कंपनीचे सीईओ तौसीफ रेयाज यांना जबाबदार धरलं आहे. 'तौसीफ रेयाज तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अनेक फसव्या योजना राबल्याचे आमच्या याआधीही निदर्शनास आले होते. यासह गेल्या अनेक महिन्यांपासून ते कंपनीचे पैसे लुबाडत असल्याचेही आम्हाला समजले आहे,' असे या कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे. 

नेमकी योजना काय राबवली जायची? 

द मिनंट या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार ही कंपनी गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याच्या वेगवेगळ्या ऑफर्स द्यायची. तुम्ही एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या पेंडटवर 10 हजार रुपयांची सूट दिली जायची. तसेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर आम्ही  6 टक्क्यांनी परतावा देऊ, असे आश्वासनही या कंपनीकडून दिले जायचे. ही कंपनी फेब्रुवारी 2024 मध्ये चालू झाली होती. पुढील महिन्यात या योजनेला एक वर्षे पूर्ण होणार होते. मात्र त्याआधीच लोकांची कथितपणे फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. 

वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल

दरम्यान, फसवणुकीचा हा कथित प्रकार समोर आल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 (4), 316 (5), 61 तसेच महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम  तीन आणि चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या मतानुसार या योजनेच्या माध्यमातून फसवणूक झालेल्यांची संख्या आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

हेही वाचा :

10 वी-12 वी शिक्षण झालेल्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, कसा कराल अर्ज?

Torres Scam Mumbai: रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होताABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDhananjay Munde News : मी राजीनामा दिलेला नाही, विरोधकांच्या मागणीवर धनंजय मुंडे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडेंनी ठामपणे सगळंच सांगून टाकलं
धनंजय मुंडेंच्या देहबोलीतील कॉन्फिडन्स कायम, ठाम स्वरात म्हणाले, 'काहीही मंत्रि‍पदाचा राजीनामा वगैरे दिलेला नाही'
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
Embed widget