एक्स्प्लोर

नांदेडमध्ये काँग्रेसला पुन्हा हादरा? माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग

नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे हे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Mohanrao Hambarde : नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे हे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोहनराव हंबर्डे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

18 जानेवारीला मोहनराव हंबर्डे यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

काँग्रेसचे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आमदार मोहनराव हंबर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेनवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण आजच त्यांनी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या 18 जानेवारीला मोहनराव हंबर्डे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची दाट शक्यताअसल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या आनंद बोंढारकर यांनी केला होता हंबर्डेंचा पराभव

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी 3592 मतांच्या फरकाने अपक्ष दिलिप व्यंकटराव कंदकुर्ते यांचा पराभव करुन जागा जिंकली.नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा (एमपी) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा 59442 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, मागच्या काही दिवसापूर्वी खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीत वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या मुलाचा कमी मतांच्या फरकाने विजय झाला होता. तर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आनंद बोंढारकर यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. नांदडे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यामध्ये किनवट, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, हदगाव, लोहा, देगलूर, मुखेड या मतदारसंघाचा समावेश आहे. या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगला होता. या जिल्ह्यातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, सर्वच जागांवर माहयुतीनं वर्चस्व मिळवलं आहे.  

महत्वाच्या बातम्या:

नांदेड दक्षिणमध्ये आनंद बोंढारकर विजयी, काँग्रेसच्या मोहन हंबर्डेंना पराभवाचा धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget