Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही हत्या केली ती कोनलाच पटली नाही. तरी फेसबुकवर जाऊन असं करीन तसं करीन. धनंजय मुंडे हे बोगस मतावर निवडून आले आहेत.
बीड : आमदार सुरेश यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येबाबत निषेध व्यक्त करत, क्रूर हत्या केल्याचं म्हटलं. त्यानंतर, या मोर्चात सहभागी झालेल्या राज्यातील सर्वच नेत्यांचे, जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे आमदार, खासदार यांचं नाव घेऊन भाषणाला सुरुवात केली. खून मर्डर होतात पण याची पद्धत फार चुकीची आहेत. माणसाचा खून करता, गोळ्या घाला, गाडी खाली घाला किमान जीव लवकर गेला असता. पण मारायचेच का? बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने साधी मुंगी, मोर मारला तरी गुन्हा दाखल होतो. संतोष हा तीन वेळा सरपंच होता, तीन वेळा सरपंच असलेला माणूस, जिल्हा परिषद सदस्य होण्यासारखा माणूस होता. समाजासाठी काम करणारं हे पोरगं होतं. पण, क्रूरतेनं संतोषला मारलं, त्याच्या पाठीवर जखमीवर 56 जखमा आहेत, 6 जणांनी मिळून ह्या 56 जखमा केल्या आहेत, अशी माहिती सुरेश धस (Suresh Dhas) यांनी दिली.
ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही हत्या केली ती कोनलाच पटली नाही. तरी फेसबुकवर जाऊन असं करीन तसं करीन. धनंजय मुंडे हे बोगस मतावर निवडून आले आहेत. गोलीमार भेजेमे असं गाणं होतं, पण बीड जिल्ह्यात कुठंही गोली मार असं सुरूय, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी बीडमधील दहशत आणि बंदुकशाहीवरुन हल्लाबोल केला. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी बंदुकीचे परवाने दिले आहेत, त्या सर्वांवर कारवाई करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
पंकुताई तुम्ही 12 डिसेंबरला विमानतळावर उतरला, मला माहितीय लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेबांची जयंती होती. त्यासाठी, आपण आला होतात. पण वाकडी वाट करुन तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का नाहीत गेला?. तुम्ही बोलतात फक्त कोरडं, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना सवाल केला आहे. पंकजा ताई तुम्हाला चांगले लोकं चालत नाहीत, तुम्हाला जी.. हुजिरी करणारे लोकं हवे आहेत. पंकुताई तुम्ही चुकलात, तुम्हाला द्यायचं असेल तर उत्तर द्या. 2019 मध्ये पंकुताई तुम्ही होता, तुम्ही का रोखलं नाही? कारण यांचं घर खालीवर आहे, असे म्हणत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. तसेच, मंत्रिपद भाड्याने दिलंय असय पंकुताई म्हणत होत्या, मी म्हणतो केवळ पालकमंत्रिपद नाही तर कृषिमंत्रिपद ही भाड्याने दिलंय. पैसे गेले तरच फाईल मंजूर होतं होती, ही आमच्या जिल्ह्याची करूण कहाणी, करुन कहाणी म्हणतो करुणा नाही, असे म्हणत धस यांनी करुणा मुंडेंवरुनही धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. पहिली बायको आहे ती करुणा.. पण त्या मायमाऊलीची अवस्था बघा, असेही ते म्हणाले.
ताईचं पुसलेलं कुंकू कोण परत करणार?
प्रत्येक भाषणात जातीचा उल्लेख दिसतोय, इतक्या वर्षात राजकारण पाहून माझ्या मनाला वाईट वाटतं. तुम्ही वाल्मिक का म्हणता? हा वाल्मिक नाही वाल्या आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला होता पण इथ वाल्मिकीचा वाल्या झालाय. हा शिवराज बांगर, याच्यावर किती गुन्हे वाल्याने दाखल केले विचारा, हा घरात कमी आणि कोर्टात जास्त असतो. बीडच्या परिस्थितीला पालकमंत्री आणि पोलीस जबाबदार आहेत. इथला प्रत्येक अधिकारी धनंजय मुंडेलाच विचारून करणार असाल तर कशी हिंमत होईल, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. या आमच्या ताई यांचा कोणाला विचार आहे? यांचं पुसलेले कुंकू कोण परत आणणार? कुठून आणली ही तुम्ही राजकारण? उद्या तुमचं घरं जळेल तेव्हा कोणीही येणार नाही. तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवा, वेळीच कारवाई झाली नाही तरी महाराष्ट्रामध्ये आग लागल्याशिवाय राहणार नाही, असेही आव्हाड यांनी म्हटलं.
हेही वाचा