धक्कादायक! कार रेसिंगचा सराव करताना प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर, व्हिडीओ आला समोर
दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता अजित कुमारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ajith Kumar Accident: दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील अभिनेता अजित कुमार एका भयानक अपघातातून वाचला आहे. हा अभिनेता सध्या दुबईमध्ये एका कार रेसिंग स्पर्धेचा सराव करत होता. हाच सराव करत असताना त्याच्या कारला अपघता झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातून अजित कुमार मात्र वाचला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अजित कुमार सध्या दुबईत आहे. तो दुबईत होणाऱ्या आघामी दुबई 24-H या कार रेस स्पर्धेत सहभागी होणार आहे. याच कार रेससाठी अजित कुमार मंगळवारी सराव करत होता. मात्र सरावादरम्यान या कारचा अपघात झाला. या अपघातात अजित कुमारचा जीव सुदैवाने वाचला. मात्र या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अपघात कसा घडला?
कार रेसचा सराव करताना 6 तासांच्या एंड्यूरेन्स टेस्ट सेशनदरम्यानस हा अपघात घडला. अजित कुमार चालवत असलेली कार थेट बॅरियरला धडकली. हार नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे हा अपघात घडला. अपघातानंतर कार एकाच जागेवर जोर-जोरात गोल फिरत असल्याचे दिसत आहे. तसेच कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाल्याचं दिसतंय. हा अपघात झाल्यानंतर मात्र अजित कुमार कारच्या बाहेर सुरक्षितपणे बाहेर निघताना दिसत आहे. अजित कुमारला काहीही झालेलं नाही.
अजित कुमारच्या टीमने दिली माहिती?
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अजित कुमारच्या टीमने अपघाताबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार अजित कुमार अपघातातून सुदैवाने बचावला. मंगळवारी दुपारी 12 वाजून 45 मिनटांनी सराव करत असताना अजित कुमारची कार बॅरियरला धडकली. अपघातानंतर तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी लगेच अजित कुमारची मदत केली. त्यानंतर अजित कुमार लगेच दुसऱ्या कार रेसचा सराव करण्यासाठी निघून गेला.
पाहा व्हिडीओ :
Ajith Kumar’s massive crash in practise, but he walks away unscathed.
— Ajithkumar Racing (@Akracingoffl) January 7, 2025
Another day in the office … that’s racing!#ajithkumarracing #ajithkumar pic.twitter.com/dH5rQb18z0
11 आणि 12 जानेवारी रोजी होणार कार रेस
दरम्यान, अजित कुमार स्वत: एका रेसिंग टीमचा मालक आहे. ही टीम अजित कुमारने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च केली होती. सध्या अजित कुमार मॅथ्यू डेट्री, फॅबियन डफीक्स आणि कॅमरून मॅकलियोड या टीममेट्ससोबत 24H दुबई 2025 या रेससाठी दुबईत आहे. ही रेस येत्या 11 आणि 12 जानेवारी रोजी होणार आहे.
हेही वाचा :