9 वर्षे लिव्ह-इनमध्ये, पण त्याचं 'प्रिया'सोबत अफेअर, वाचा बिपाशा बसू-जॉन अब्राहमच्या ब्रेकअपची धक्कादायक इनसाईड स्टोरी!
बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम हे एकमेकांच्या प्रेमात होते. साधारण नऊ वर्षे ते सोबत राहिले. नंतर मात्र त्यांचे ब्रेकअप झाले.
मुंबई : बॉलिवुडमधील प्रेम प्रकरणं, अफेअर्स यांची नेहमीच चर्चा होत असते. आज बिपाशा बसू या प्रसिद्ध अभिनेत्रीचा 46 वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने तिच्या आणि अभिनेता जॉन अब्राहम यांच्या प्रेम प्रकरणाची नव्याने चर्चा केली जात आहे. हे दोघेही एकमेकांसोबत साधारण 9 वर्षे राहिले. दोघेही लिव्ह इनमध्ये राहायचे. त्यांचे नाते संपूर्ण जगाला सर्वश्रूत होते. मात्र त्यांनी एकमेकांशी लग्न केलं नाही. त्यांच्या ब्रेकअपची कहाणी तर फारचं वेगळी आहे. जॉन अब्राहमचं दुसऱ्या मुलीशी अफेअर होतं. हे बिपाशाला माहिती झाल्यामुळे त्यांच्यातील नाते संपुष्टात आले होते, असे म्हटले जाते.
बिपाशा बसू होती जॉन अब्राहमच्या प्रेमात
बिपाशा बसून कधीकाळी आपला काळ गाजवलेला आहे. बॉलिवुडमध्ये तिचे नाव डिनो मोरिया, मिलिंद सोमन, राणा दुग्गाबती, हरमन बावेजा तसेच जॉन अब्राहम यांच्याशी जोडले गेले. मात्र या सर्वांपैकी बिपाशाने फक्त जॉन अब्राहमसोबत रिलेशनशीपमध्ये होती, हे मान्य केलेलं आहे. विशेष म्हणजे तिने एका मुलाखतीत जॉनसोबत ब्रेकअप करण्याचं कारणही सांगितेलेलं आहे.
जॉनसोबत लग्न करायचं होतं पण...
बिपाशा बासूने याआधी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीत तिने जॉनसोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. तिने जॉनसोबत ब्रेकअफ का झालं होतं, याबाबतही सविस्तर सांगितलं होतं. तिला जॉन अब्राहमसोबत लग्न करायचं होतं. 9 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे तिला आता लग्न करण्याची इच्छा होती. मात्र जॉनला करिअर करायचं होतं. करिअर झाल्यानंतर लग्न करायचं असं त्याचं मत होतं, अशी माहिती बिपाशा बसूने दिली होती.
जॉन अब्राहमने तिला दिला धोका?
सोबतच, हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असताना तिच्या निदर्शनास एक ट्विट आले. या ट्विटमुळे जॉन अब्राहम तिला धोका देतोय, असं बिपाशाला समजले होते. या ट्विटमध्ये जॉन अब्राहमने त्याच्या नावासोबत त्याच्या प्रिया या एनआरआय गर्लफ्रेंडचे नाव दिले होते. हे ट्विट पाहिल्यानंतर बिपाशाला धक्काच बसला होता. याच कारणामुळे जॉन आणि बिपाशात वाद झाला. त्यानंतर 2011 मध्ये त्यांचे ब्रेक अप झाले.
नंतर मात्र झाले ब्रेकअप, मग 2016 साली केलं लग्न
दरम्यान जॉन आणि बिपाशा यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केलेले आहे. 2002 साली जिस्म चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये सोबत राहूल लागले. या दोघांचे जिस्म, ऐतबार, मदहोशी, विरुद्ध असे चित्रपट आहेत. मात्र 2011 मध्ये दोघांचेही ब्रेक अफ झाले होते. या ब्रेकअपनंतर बिपाशा बसू मनातून खचली होती. मात्र करिअर संपू नये म्हणून तिने वेळीच स्वत:ला सारलं. त्यानंतर 2012 साली बिपाशा बसूची भेट करण सिंह ग्रोवर याच्याशी झाली. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम झाले. त्यानंतर 2015 साली त्यांचा अलोन हा चित्रपट आला. पुढे 2016 साली त्यांनी लग्न केले. आज त्यांना एक मुलगी आहे.
हेही वाचा :
गोड बातमी! सना खानच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला, 'राजकुमार' घरी येताच खास पद्धतीने दिली खुशखबर!
कपाळावर चंदनाचा टिळक आणि हात जोडून भगवान भोलेनाथांच्या भक्तीत तल्लीन झाली सारा अली खान; पाहा फोटो!