Delhi Assembly Election 2025 : 5 फेब्रुवारीला 1 कोटी 55 लाख मतदार ठरवणार दिल्लीचा कारभारी, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या 5 फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल लागणार आहे.
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या 5 फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल लागणार आहे. आज निवडणूक आयोगानं पत्राकर परिषद घेत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळं दिल्लीचा नवीन कारभारी कोण हे येत्या 8 फेब्रुवारीला ठरणार आहे. यामध्ये 1 कोटी 55 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कसा असेल दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना कधी निघणार?- 10 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- 17 जानेवारी
उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- 18 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी
मतदानाची तारीख- 5 फेब्रुवारी
निकालाची तारीख- 8 फेब्रुवारी
दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी निवडणूक पार पडणार
दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. या निवडणुकीत 'आप'ने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये 'आप'ने दिल्लीत वर्चस्व राखले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह 'आप'च्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डळमळीत झाली आहे. याशिवाय, सलग 10 वर्षे सत्तेत असल्यामुळे सत्ताधारी'आप' विरोधात अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टर निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दिल्लीत विधानसभेत तिरंगी लढत होणार
अरविंद केजरीवाल नेहमीप्रमाणे लोकप्रिय घोषणा करुन दिल्लीची सत्ता राखणार की भाजप 'आप'ची राजवट उलटवण्यात यशस्वी ठरणार, हे पाहावे लागेल. दिल्लीत बहुमतासाठी 36 ही मॅजिक फिगर आहे. यंदा दिल्ली आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेस आणि 'आप'चा मतदारवर्ग एकच असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या विधानसङा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यामध्ये आण आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. या ठिकाणी एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. या निवडणुकीत 'आप'ने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता.
महत्वाच्या बातम्या: