एक्स्प्लोर

Metastatic Breast Cancer: मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये परिवर्तन; किमोथेरपीपेक्षा वेगळ्या उपचार पद्धती

Metastatic Breast Cancer: मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या विरोधातील लढाईमध्ये भारतासमोर काही आगळीवेगळी आव्हाने उभी राहिलेली दिसतात. यातील काही आव्हानांमध्ये आरोग्यसेवा सुविधांची मर्यादित उपलब्धता आणि MBC विषयी जागरुकतेचे कमी प्रमाण या समस्यांचा समावेश आहे.

Metastatic Breast Cancer: भारतात आणि जगभरातही मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर (MBC) च्या उपचारांमध्ये बदल घडून येत आहेत आणि या बदलांमागे औषधशास्त्र, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अत्यंत आधुनिक अशा नव्या शोधांची प्रेरणा आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्सेसनुसार, सुमारे भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या 60 टक्‍के रुग्णांचं निदान हे या आजाराच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यावर होते. (According to the National Library of Medicine, approximately 60% of Indian cases are diagnosed with breast cancer in stages III and IV of the disease.) तेव्हा या क्षेत्रात होणारे नवे बदल ही केवळ आशा नसून गरजेची बाब आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रगत आणि लक्ष्यित उपचारपद्धती, इम्युनोथेरपी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नेक्स्ट जनरेशन डायग्नोस्टिक्सच्या क्षेत्रांमध्ये नव्या वाटा निर्माण करणारी मोठी पावले उचलली गेली आहेत आणि त्यामुळे रुग्णांच्या आणि आरोग्यसेवा पुरविणाऱ्यांच्या मनामध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. 

मेटास्टॅटिक कॅन्सरचे भारतातील चित्र समजून घेताना 

मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या विरोधातील लढाईमध्ये भारतासमोर काही आगळीवेगळी आव्हाने उभी राहिलेली दिसतात. यातील काही आव्हानांमध्ये आरोग्यसेवा सुविधांची मर्यादित उपलब्धता आणि MBC विषयी जागरुकतेचे कमी प्रमाण या समस्यांचा समावेश आहे. काही समाजांमध्ये या आजाराशी जोडलेली सामाजिक भावना हा या आव्हानांत भर घालणारा आणखी एक घटक आहे. बहुतांश स्त्रिया आजाराच्या अखेरच्या टप्प्यावर वैद्यकीय उपचार घेऊ पाहतात, पण या टप्प्यावर उपचारांचे स्वरूप आधीच गुंतागूंतीचे झालेले असते व त्यांचा परिणामही होत नाही. भारतीय रुग्णांच्या जनुकीय आणि चिकित्सात्मक रूपरेखेनुसार आखण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपचारपद्धती वापरात आणणे हे अधिक चांगले परिणाम प्राप्त करण्याचे आणि आजारातून वाचण्याचे प्रमाण वाढविण्याचे एक महत्त्वपूर्ण धोरण म्हणून उदयास आले आहे. 

किमोथेरपीच्या पुढे पोहोचलेल्या प्रगत उपचारपद्धती 

गेल्या काही वर्षांमध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरच्या उपचारांमध्ये सातत्याने लागलेल्या नवनव्या शोधांमुळे प्रगत उपचारांचे नवनवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. HER2- पॉझिटिव्ह आणि हार्मोन रिसेप्टर-पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर्ससाठीच्या न्यू-जनरेशन औषधांनी अभूतपूर्व अशी परिणामकारकता दर्शविली आहे. ही उपचारपद्धती कॅन्सरग्रस्त पेशींवर हल्ला करते तर निरोगी ऊतींना सुरक्षित ठेवते, ज्यामुळे दुष्परिणामांचे प्रमाण किमान पातळीवर येते आणि रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारतो. या प्रगत उपचारपद्धतींमुळे, अनेक रुग्ण कोणत्याही लक्षणीय अडथळ्यांविना बऱ्यापैकी दीर्घ आयुष्य जगत आहेत. 

इम्युन थेरपीला नवी कलाटणी 

ट्रिपल-निगेटिव्ह मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर या उपचारांच्या दृष्टीनं सर्वात अवघड अशा उपप्रकाराच्या बाबतीतही यावर्षी क्रांतिकारी प्रगती झाल्याचे दिसून आलं आहे. या उपचारपद्धतीमधील रोगप्रतिकार यंत्रणेला कर्कपेशी शोधण्यास मदत करणाऱ्या इम्युन चेकपॉइंट्स इनहिबिटर्सच्या आशादायी परिणामांपैकी PD-1 आणि PD-L1 ब्लॉकर्सनी कर्कपेशींना मिळणाऱ्या शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा प्रतिसाद सक्रिय करण्याच्या बाबतीत नक्कीच आश्वासक काम केले आहे. प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमरच्या स्वरूपानुसार तयार केलेल्या वैयक्तीकृत लशी आशेचा नवा किरण म्हणून उदयास येत आहेत व जिथे पारंपरिक उपचारपद्धती आधीच अपयशी ठरतात अशा ठिकाणी ठोस प्रतिसाद पुरवित आहेत. 

मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारांमध्ये AI प्रीसिशन मेडिसीनचा उदय 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रेण्वीय रूपरेखा (मॉलेक्युलर प्रोफाइलिंग) वेगाने साकारण्याच्या, पूर्वानुमानावर आधारित विश्लेषण पुरविण्याच्या आणि रोगाचे लवकरात लवकर निदान करण्याच्या क्षमतेमुळे मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानाचा व उपचारांचा चेहरामोहरा बदलत आहे. AI अल्गोरिदम्समुळे ट्यूमरच्या स्वरूपाचे चटकन विश्लेषण करता येते व त्यावरील उपचारासाठी सर्वात प्रभावी वैयक्तिकृत उपचारपद्धतींची निवड करता येते, हे करताना प्रेडिक्टिव्ह टूल्सच्या मदतीने आजार कशाप्रकारे वाढेल याचे पूर्वानुमान काढता येते आणि त्यानुसार उपचारांच्या नियोजनामध्ये आधीच बदल करता येतात. यामध्ये अशाही संसाधनांचा समावेश आहे, जी जोखमीचे स्वरूप समजून घेत कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतींचे लोकशाहीकरण करतील. या संसाधनांमुळे ज्या ठिकाणी इमेजिंग तज्ज्ञ उपलब्ध नाहीत अशा ठिकाणीही आजाराचे लवकरात लवकर निदान होण्यास मदत करणारी विश्लेषणे उपलब्ध होऊ शकतील. सेंटर फॉर फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन इंडियासारखे उपक्रम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहाय्याने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत प्रीसिशन मेडिसीन उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांमध्ये AI आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञान समाविष्ट करून घेत या बदलांना वेग मिळवून देतील अशी अपेक्षा आहे.

नेक्स्ट-जेन डायग्नोस्टिक्स 

उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर देखरेख ठेवणे आणि मेटास्टॅसिसचे (कर्कपेशींचा मूळ जागेवरून इतरत्र फैलाव होणे) लवकरात लवकर निदान हे MBC च्या व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक आहेत. यावर्षी रक्तात अभिसरित ट्यूमर DNA चे विश्लेषण करणाऱ्या लिक्विड बायोप्सीज- मिनिमली इन्व्हेजिव्ह चाचण्या प्रगत निदानपद्धतींचा आधारस्तंभ म्हणून उदयास आल्या आहेत. खुद्द हाय-रेझोल्युशन इमेजिंग तंत्रज्ञानांनीही आजाराच्या फैलावाचा मागोवा घेण्याच्या तंत्रामध्ये प्रगती केली आहे व वेळच्या वेळी वैद्यकीय हस्तक्षेप होण्यास आवश्यक असलेला निदानातील अभूतपूर्व अचूकपणा साध्य केला आहे.

या नव्या शोधांमुळे मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर तंत्रज्ञान व उपचारपद्धतींद्वारे मिळणाऱ्या उपचारांना आणखी नवे रूप मिळणार आहे. मूळात आयुष्य लांबविण्याच्या हेतूने लावल्या गेलेल्या या शोधांमुळे मेटास्टॅटिक कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आशेची आणि सन्मानाची भावना पुनर्स्थापित केली आहे. इम्युनोथेरपीमध्ये AI-संचलित प्रीसिशन मेडिसीनने तयार केलेल्या नव्या वाटांपासून ते या वर्षी उचलल्या गेलेल्या मोठ्या पावलांपर्यंत विविध प्रयत्नांतून आणखी उज्ज्वल भविष्यासाठीचा मंच सिद्ध झाला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुकंपेच्या भावनेतून केली जाणारी देखभाल यांच्या सहयोगातून मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर एका अशा स्थितीमध्ये परिवर्तित होत आहे, जिथे रुग्णांना प्रदीर्घ आणि अधिक चांगले आयुष्य जगता येणे शक्य आहे.

(वरील लेख डॉ. चंद्रगौडा दोडगौडर, डिरेक्टर मेडिकल ऑन्कोलॉजी, BLK-MAX सुपर स्पेश्यालिटी हॉस्पिटल यांच्या अहवाल्यानं दिला जात आहे. ABP Majha यातून कोणताही दावा करत नाही.) 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 11 AM 07 January 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते..संजय राऊत यांची सडकून टीका #abpmajha100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Embed widget