HMPV Virus : HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधणार
HMPV Virus : HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांशी संवाद साधणार आहेत.
HMPV Virus : कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा जग एचएमपीव्ही व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील व्हायरसमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यानंतर आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागसह (Maharashtra Health Department) सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. हा व्हायरस धोकादायक नाही, त्याचबरोबर याच्या उपचार पद्धती माहिती आहेत, घाबरून जाऊ नका. सावध रहा, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऑनलाईन पध्दतीने संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे आदेश
100 दिवसात प्राधान्याने करावयाची कामे याबाबत आढावा घेतला जाणार आहे. विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा 100 दिवसांचे टार्गेट दिले जाणार असल्याची माहिती आहे. आपल्या वेबसाईट सुसज्ज करा, माहिती अधिकारात मागितली जाते, अशी सर्व माहिती त्यावर आधीच टाका, ती संकेतस्थळे सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. कार्यालयांची सफाई करा, अनावश्यक कागदांचे ढीग रिकामे करा. वाहनांचे भंगार साफ करा. कार्यालय स्वच्छ ठेवा. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या सरप्राइज भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. इज ऑफ लिव्हिंग लक्षात घेता किमान 2 सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात कराअसे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर पेंडिंग कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. सामान्य माणूस कोणत्या वेळेत भेटायला येऊ शकतो, त्याची सुस्पष्ट माहिती पाटीवर नमूद करा. 90% बाबी स्थानिक पातळीवर सुटू शकतात. पण ते होत नाही, म्हणून मंत्रालयात गर्दी होते. लोकशाही दिनसारखे उपक्रम राबवा. गुंतवणुकीसाठी लोक येतात, तेव्हा त्यांना कुणीही त्रास देत नाही, हे सुनिश्चित करा. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. फ्लॅगशिप कार्यक्रम/योजनांना भेटी तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र येथे भेटी झालेच पाहिजे. ही सर्व कामे होत आहेत की नाही, याकडे पालक सचिवांनी लक्ष घालावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती
जगातील अनेक देशांमध्ये हयुमन मेटा न्युमोनिया व्हायरस (एचएमपीव्ही) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. आपल्या देशात आज पर्यंत एकून पाच रुग्ण कर्नाटक, तामिळनाडू व गुजरात या राज्यात आढळून आले. त्या पैकी एक रुग्ण पुर्णपणे बरा होवून घरी गेलेला आहे. उर्वरित रुग्ण बरे होत आहेत. हा आजार गंभीर नसून लहान मुलं, वृद्ध आणि इतर गंभीर आजर असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.आपल्या राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये कारण सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जारी करुन या रोगाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आळा घालण्यात येईल असे सांगितले. राज्यात सद्यस्थितीत एकही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला नाही. सर्व अधिष्ठातांनी संभाव्य प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी औषधांसह ऑक्सिजन व आवश्यकता वाटल्यास विलगीकरण यासाठी तयारीत रहावे अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )