Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. यात शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे.
Santosh Deshmukh Beed Morcha बीड: संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये उपस्थित नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. ज्या दिवशी मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्या दिवशी या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. हे खंडणीखोर कोण हे बघितलं तर आणि त्यांचे मास्टर माईंड तपासले तर लक्षात येईल की, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...
तुम्हाला खरंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल, आणि या बीड जिल्ह्याच्या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही सांगा की, राजीनामा फेकून मी पुढील चौकशीसाठी समोर जात आहे. असं का तुम्ही करत नाही? तुम्हाला मंत्रीपद आमचे मुडदे पाडायला हवे आहे का? मुळात याचं नावच कशाला घ्यायचं, हा केवळ एक दलाल आहे. यांच्यावर बोलण्याइतपत हा मोठा नसल्याची घणाघाती टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले. या मोर्च्यात भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, मेहबूब शेख या मोर्चामध्ये सहभागी झाले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी भाषण करत लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली. तसेच मी ओबीसी आहे, तरी म्हणतो या वाल्मिक कराडला आधी आत टाका, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं.
तर तुमच्या ताकतीच्या जोरावर आज मी जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून गेलो आहे. बीड जिल्ह्याच्या जनतेचा आशीर्वाद आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आशीर्वादाने मी आज खासदार म्हणून निवडून गेलो आहे. मात्र आज दिवसाढवळ्या हत्या होत असताना याच्या मागे कोण आहे? हे तपासलं पाहिजे. नक्कीच यामागे प्रशासनाचे हातभार असल्याशिवाय असे कृत्य होणे नाही. असेही खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.
सच्चा माणसाला घालवण्याचे काम परळीवाल्यांनी केलं- बजरंग सोनवणे
राज्यात 2019 ते 2024 या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेलेली नाही. तुमच्या साक्षीनं मी आज सबंध महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, संतोष देशमुख सारखा सोज्वळ आणि प्रामाणिक तरुणाने कुणालाही अपशब्द बोलला नाही. अशा प्रामाणिक सच्चा माणसाला घालवण्याचे काम परळीवाल्यांनी केलं आहे. या सर्वांचं मुळे कुठे असेल तर मे महिन्यातच खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून या प्रकरणाची सुरुवात झाली. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. सोबतच कंपन्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा नाश करणाऱ्यांना ही कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आज 20 दिवस होतं आहेत अद्याप मारेकरी मोकाट आहेत, आणि निव्वळ आश्वासन मिळत आहेत. असेही खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.
संबंधित बातमी: