प्रियांका चोप्रा 'डॉन-3' मध्ये पुन्हा दिसणार? डॉनला पकडायला 'जंगली बिल्ली' कमबॅक करणार का? नव्या चर्चेला उधाण!
डॉन-3 चित्रपटात प्रियांका चोप्रा दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. याआधीच्या डॉन आणि डॉन 2 या चित्रपटात तिने साकारलेले रोमा हे पात्र अनेकांना आवडले होते.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचे फॅन्स फक्त भारतात नव्हे तर जगभरात आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होती. बॉलिवुड गाजवल्यानंतर आथा ती विदेशात बड्या चित्रपटांत दिसते. बॉलिवुडमध्येही तिने अनेक बड्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे. विदेशात गेल्यानंतर गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रियांका चोप्राचा एकही भारतीय चित्रपट आलेला नाही. त्यामुळेच तिने बॉलिवुडमध्ये कमबॅक करावे, अशी मागणी केली जाते. असे असतानाच आत प्रियांका डॉन-3 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. तशी चर्चा सध्या रंगली आहे.
शाहरुख-प्रियांकाची केमिस्ट्री चांगलीच आवडली
शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या डॉन आणि डॉन-2 या चित्रपटांत प्रियांका चोप्राने साकारलेली भूमिका चांगलीच भाव खाऊन गेली होती. तिने या चित्रपटांत रोमा उर्फ जंगली बिल्ली नावाचे पात्र साकारले होते. तिने डॉन आणि डॉन-2 या चित्रपटांत पोलिसाची भूमिका केलेली आहे. ती संपूर्ण चित्रपटात डॉनला पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. याच चित्रपटांतील शाहरुख आणि प्रियांकाची केमिस्ट्री लोकांना चांगलीच आवडली होती. त्यामुळेच आता प्रियांकाला डॉन-3 या चित्रपटातही स्थान दिले जावे, अशी इच्छा तिचे चाहते व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे प्रियांकाला या चित्रपटात स्थान देण्यासाठी प्रयत्नही केला जात असल्याचं म्हटलं जातंय.
प्रियांका चोप्रा डॉन-3 मध्ये दिसणार का?
डॉन-3 या चित्रपटात प्रियांका चोप्रा परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2006 साली दिग्दर्शक फरहान अख्तरने रोमा या पात्रासाठी प्रियांकाची निवड केली होती. प्रियांकाने हे पात्र दमदारपणे साकारल्यामुळे तिचे परत डॉन-3 मध्ये कमबॅक होणार असे म्हटले जात आहे. फरहान अख्तरच्या जवळच्या लोकांनीच तसे संकेत दिले आहेत. प्रियांकाला चित्रपटात स्थान देण्याबाबत सध्या विचार केला जात आहे.
डॉन-3 मध्ये शाहरुख दिसणार नाही
खरं म्हणजे डॉन-3 या चित्रपटात शाहरुख खान दिसणार नाही. या चित्रपटासाठी फरहान अख्तरने रणवीर सिंहची निवड केली आहे. तर रणवीरच्या विरोधात कियारा आडवाणी ही अभिनेत्री असणार आहे. मात्र प्रियांका चोप्राशिवाय रोमा या पात्राला कोणीच न्याय देऊ शकत नाही, असे मत सिनेरसिकांचे आहे. सोबतच डॉन-3 या चित्रपटात शाहरुख खानदेखील पाहायला मिळावा, अशी मागणी चाहते करत आहेत.
1000 कोटी बजेट असणाऱ्या चित्रपटात प्रियांका दिसणार
दरम्यान, डॉन-3 चित्रपटात प्रियांका दिसणार असल्याची फक्त चर्चा आहे. यावर चित्रपटाच्या निर्णात्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र प्रसिद्ध दिग्दर्शक राजमौलीच्या 1000 कोटी बजेट असलेल्या चित्रपटात प्रियांका चोप्रा नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रियांका चोप्रासोबत या चित्रपटात महेशबाबू झळकणार आहे.
हेही वाचा :