Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
आरोपींना तातडीने उचला नाहीतर राज्यभर हे लोन जाईल. दोन मंत्री नाही कितीही गेले तरी मला फरक पडणार नाही. संतोष भैय्याला न्याय द्यायचा असेल तर कोणीही मागे पडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Manoj Jarange Patil : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूक हाती घ्यावं लागेल, अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा. बीडमध्ये आज सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातून सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती प्रहार करताना वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली. आरोपींना तातडीने उचला नाहीतर राज्यभर हे लोन जाईल. दोन मंत्री नाही कितीही गेले तरी मला फरक पडणार नाही. संतोष भैय्याला न्याय द्यायचं असेल तर कोणीही मागे पडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना कारवाई न केल्यास दंडूक हाती घ्यावं लागेल, असा इशारा दिला. जरांगे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे नेत्यांना विनंती आहे तुम्हीच मुख्यमंत्रीकडे जा. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा. जेवढी नावं तुम्ही सांगाल तेवढी अटक करा. जरांगे म्हणाले की, आमची भाषणे होऊन जातील. संतोष भैय्याच्या मुलीचं तोंड एकदा बघा.
राज्यभरात आंदोलनाची तयारी करा
त्यांनी सांगितले की, राज्यभरात आंदोलनाची तयारी करा. धाडसी होऊन जो हल्ला करेल त्याला जशाचा तसे उत्तर द्या. सर्वांना नेत्यांना हात जोडून विनंती आहे, तुमच्यावर जबाबदारी असून आरोपीना अटक करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, एक शब्दही विरोधात बोलणार नाही, अटक नाही केली, तर घोडे लावणार. त्यांनी साांगितले की, तुमचा नेता (फडणवीस) आमचा दुष्मन नाही. आरोपी सापडणे मोठी गोष्ट नाही, आमच्या मुलांनी कमेंट केली तर अटक केली, पण खुनाचे आरोपी तुम्हाला सापडत नाहीत संतोष दादाची हत्या झाली, परभणीत झालं, धाराशिव मध्ये असच प्रकार घडला आहे. अंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावी लागली. काही मंत्र्यांना राज्यात विध्वंस घडवायचा असला तरी आमची ते होऊ देणार नाही. प्रत्येकाला अटक करा, राज्यपालांची परवानगी घ्या आणि अटक करा, राज्यपाल सुद्धा तुमचेच आहेत, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या