एक्स्प्लोर

Shivsena UBT: ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची प्रवेशाची तयारी तर दुसरीकडे भाजपातील नेत्यांची नाराजी; इच्छुकांची रांग असताना प्रवेश का?

BJP: माजी नगरसेवकांच्या संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांवरती सध्या टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळे इच्छुकांनी नाजारी दर्शवली आहे.

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) मोठं खिंडार पडल्याचं चित्र आहे. काही दिवसांवर येवून ठेपलेल्या निवडणुकीआधी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) हे पाच माजी नगरसेवक मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी एक वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भाजप (BJP) पक्ष कार्यालयात पार पडणार आहे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगिता ठोसर आणि प्राची आल्हाट हे नगरसेवक शिवबंधन सोडून कमळ हाती घेणार आहेत, एकीकडे पक्षप्रवेश होत असतानाच दुसरीकडे पक्षातील नाराजी समोर येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश देत असल्याने नाराजीनाट्य सुरू झालं आहे. या पाच माजी नगरसेवकांच्या संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांवरती सध्या टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळे इच्छुकांनी नाजारी दर्शवली आहे. (Shivsena UBT)

त्याचबरोबर इच्छुकांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत झोकून काम केलं, त्यानंतर आता महापालिकेसाठी उमेदवारी मिळण्याची आस असतानाच या पाच प्रभागामध्ये नव्याने पक्षप्रवेश झालेल्यांना संधी मिळाली तर पक्षासाठी काम करूनही डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांकडून पक्षसंघटनेतील पदाधिकार्‍यांकडे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधितांना पक्षात घेऊ नये, अशीही मागणी केली जात होती. मात्र, आज या पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्या पक्षातील या पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेत असतानाच भाजपमधील काही नेत्यांबरोबरच संघटनेतील नेत्यांनाही विश्वासात घेतले गेलं नसल्याच्या चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे या राच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याबाबत पक्षातच काहींमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. त्यामुळे रविवारी होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, या पाच जणांचा पक्षप्रवेश आज (मंगळवारी दि. 7) मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

पक्षातून अनेक जण इच्छुक असताना प्रवेश कशासाठी?

2017 मध्ये पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडे तितके सक्षम आणि निवडून येणारे उमेदवार नव्हते. त्यामुळे त्या निवडणुकीवेळी भाजप पक्षाने इतप पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस या पक्षातून उमेदवार घेऊन भाजपने निवडणूक लढली होती आणि मोठी मजल मारली होती, त्या निवडणुकीमध्ये मोठं बहुमत मिळवण्यात भाजपला यश आलेलं होतं.

त्यानंतर आता गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील राजकीय चित्र पालटलं आहे, परिस्थिती बदलली आहे. भाजप पक्षाकडे इच्छुकांची मोठी रांग आहे. अनेक सक्षम आणि इच्छुक उमेदवार पक्षाकडे असतानाच आणि महापालिकेची पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्यामुळे हा पक्षप्रवेश का याची चर्चा आहे,  नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याने त्या प्रभागात सक्षम उमेदवार आहे की नाही, याबाबातचं चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार? हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं असतानाही पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याची घाई का? असा सवालही काही पदाधिकार्‍यांनी उपस्थित केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Embed widget