MNS च्या Mahayuti तल्या एन्ट्रीला शिंदेंकडून ब्रेक? भाजप मनसेला दत्तक घेणार? Special Report
विधानसभेत आपण का हरलो? महायुतीत कुणामुळे एन्ट्री मिळाली नाही? या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा मनसे प्रयत्न करतंय.. आणि ही उत्तर शोधताना मनसेकडून खापर फोडलं जातंय ते एकनाथ शिंदेंवर. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपशी हातमिळवणी करण्याच्या मनसेचा खटाटोप सुरू आहे... यात मनसे यशस्वी होणार का? आणि झाली तर त्याचे परिणाम काय असतील.. या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात
१ आमदारापुरतं का होईना, मनसेचं विधानसभेत अस्तित्व होतं... मात्र मतदारांप्रमाणे १ या आकड्यानं देखील यंदा राज ठाकरेंच्या मनसेला पाठ दाखवली... विधानसभेचे निकाल लागून जवळपास दीड महिना लोटलाय.. आता मनसे या दीड महिन्यात पराभवाच्या धक्क्यातून कितपत सावरलीय हे राज ठाकरेंनाच ठाऊक. मात्र महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं तयारी सुरू केलीय.. यासाठी राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली.... या बैठकीत मंथन झालं आणि सर्वांना एक गोष्ट उमजली.... ती म्हणजे, मनसे आणि भाजपची युती रखडली ती एकनाथ शिंदेंमुळे.... होऊ न शकलेल्या युतीच्या मॅटरचं खापर, मनसे एकनाथ शिंदेंवर का फोडतेय? मनसेच्या बैठकीत नेमकी काय खलबतं झाली? तेपण जाणून घेऊया, विधानसभेत शिंदेंमुळे मनसेची महायुतीतील एन्ट्री रखडली असं मत मनसेच्या बैठकीत मांडण्यात आलं महापालिका निवडणुकीत युती आणि इतर वाटाघाटीसाठी टीम नेमणार असल्याचं निश्चित करण्यात आलं पहिल्या फळीतील नेत्यांची टीम पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेणार आहे